अक्कलकोट अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयच्या वतीने इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड आणि शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत अंजुमन तरगीचे तालीम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.  या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 

इंटरमिजिएट परीक्षेत अंजुम जमादार आणि सबा मुजावर या विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींनी 'अ' श्रेणी घेतली आहे. या यशामुळे शालेय स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळाले आहे. 

शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या एलिमेंटरी परीक्षेतदेखील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यशस्वी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महेक जमादार, शिफा बागवान, अय्युब अबुबकर, अबुबकर बागवान, अलमास मुजावर, अंजुम पटेल, अर्शद अत्तार, आणि हमिदाबी आळंद यांनी 'अ' श्रेणी घेऊन विशेष प्रावीण्य प्राप्त केले. त्याचप्रमाणे 'ब' श्रेणीमध्ये जिया काझी, अफ्सीया सय्यद, जोया शेख, अल्तजीन फुलारी, फैजान कुरेशी, इरमसबा बेपारी, जैनबी नाईकवाडी, मंतशा तांबोळी, मुस्कान शेख, सालिया सक्करगे, तहुरा बागवान, आणि तंजीला जमादार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. यामध्ये शालेतील कलाशिक्षक अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. सोबतच शाळेतील कलाविभाग प्रमुख तसनीम शेख यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य मिळाले. 

अँग्लो उर्दू हायस्कूलच्या प्राचार्या नसरीन होटगीकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी या यशामुळे शाळेचा नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शाळेतील कला विभागाचे हे यश दर्शविते की, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते आपल्या कलाविषयक कौशल्यांचा उत्कृष्ट उपयोग करू शकतात. या यशामुळे शालेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात त्यांचे कलाविषयक विकास साधता येईल.

अँग्लो उर्दू हायस्कूल ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना कला शिक्षण देत आहे, ते केवळ चित्रकला पर्यंत मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करते. शालेतील विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यकमांद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवले जाते.

रेखाकला (इंटरमिजिएट) परीक्षा काय आहे 
सरळ साध्या भाषेत रेखाकला परीक्षा म्हणजे चित्र काढण्याची परीक्षा. ही परीक्षा शासकीय आणि इतर स्तरावर घेतली जाऊ शकते. यामध्ये स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, नक्षीकाम, कर्तव्यभूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन अशा विविध चित्रांचा समावेश केला जाऊ शकतो. 

 १९८०मध्ये शासनाने ही स्पर्धा सुरू केली होती. आता दरवर्षी जवळपास २००० विद्यार्थी या परीक्षेला बसतात. तरुण इच्छुक व्यक्तींमध्ये कला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या कल्पनेने या परीक्षांची सुरू करण्यात आली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter