उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिवलचे आयोजन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
 मनपा उर्दू शाळा क्रमांक सहामध्ये फूड फेस्टिवलमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षिका
मनपा उर्दू शाळा क्रमांक सहामध्ये फूड फेस्टिवलमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षिका

 

सोलापूर येथील महानगरपालिकेच्या उर्दू मुलांची शाळा क्रमांक ६ येथे फूड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी फेस्टिवलच्या उ‌द्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा अफसाना बागवान यांची उपस्थित होते. यावेळी शाळा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.  

फूड फेस्टीवलचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून विविध खाद्यपदार्थ करून आणले होते. यामध्ये बिर्याणी कबाब, वडा पाव, पुरी भाजी, कद्दूची खीर, गुलाब जामून, इडली डोसा, साबू खिचडी, मँगो केक, गोड पान, पावभाजी, पाणी पुरी, समोसा, गोबी मंचुरीयन आदी खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. या खाद्यपदार्थांचा आनंद विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या पाककृतींचे पालकांनी भरपूर कौतुक केले. 

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका मुजावर तलत यांनी विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ विक्रीतून व्यवहाराचे धडे शिकवले. यावेळी मिमिझा शेख हिस पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका शबाना शेख, उझमा सय्यद, शाहीन पटवेगार, अझीम शिटशिंडी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter