'यामुळे' अंतराळात अडकून पडल्या सुनिता विल्यम्स

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 7 d ago
सुनिता विल्यम्स
सुनिता विल्यम्स

 

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवकाशात अडकल्या आहेत? हे प्रश्न उपस्थित होतोय त्याच कारण त्या १३ जून रोजी अंतराळातून पृथ्वीवर परतणार होत्या. परंतु त्या अद्याप परतल्या नाहीत. त्यांच्यासोबत आणखी एक अंतराळवीर बुच विल्मोरही अडकलेत. हे दोघेही अंतराळवीर ५ जून रोजी स्टारलाइनर अंतराळयानातून अवकाशात गेले होते.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स १३ जून २०२४ रोजी पृथ्वीवर परतणार होत्या. पण अद्याप त्या आल्या नाहीत. आता जवळपास १२ ते १४ दिवस झालेत. त्या कधी परतणार हे कोणालाच सांगता येत नाहीये. नासामधील शास्त्रज्ञसुद्धा त्याविषयी अंदाज बांधू शकत नाहीयेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी चिंता सातवत आहे.

दरम्यान नासाने त्यांच्या परतण्याची नवी तारीख सांगितली आहे. आतापर्यंत दोन तारखा सांगण्यात आल्या होत्या आता नवी तारीख सांगण्यात आलीय. नासाचे क्रू मॅनेजर स्टीव्ह स्टिच म्हणतात की स्टारलाइनर ४५ दिवसांपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आणलं जाऊ शकतं. नासाच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर हे पृथ्वीवर 6 जुलै रोजी परततील, असं सांगण्यात आलं आहे.

दोघे अंतराळवीर १४ दिवसांपासून अवकाशात अडकलेत. ते कधी पृ्थ्वीवर येतील यांची माहिती नासाकडे सुद्धा नाहीये. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ चिंतेत आलेत. नेमकं काय झालं आहे, दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर कसे येतील याचे कोणते चार पर्याय आहेत, त्याची माहिती घेऊ. विलियम्स आणि बुच बुच विल्मोर अजून पृथ्वीवर आले नसल्याच्या कारणामागे स्टारलाइनरवरील हेलियम गळतीला जबाबदार धरले जातंय. स्टारलाइनर हे बोइंगचे अंतराळयान आहे.

सीबीएस न्यूजने आपल्या वृत्तात दावा केला की, ही मोहीम सुरू होण्यापूर्वी नासा आणि बोईंग व्यवस्थापकांना दोघांनाही याची माहिती होती. तरीही त्यांनी या गळतीला मिशनसाठी किरकोळ धोका मानलं. नासा आणि बोईंगच्या या निर्णयामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये अडकलेत. सुनीता आणि विल्मोर ५ जून २०२४ रोजी बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून स्पेस स्टेशनवर गेले होते. विशेष म्हणजे या कॅप्सूलमध्ये आधीपासून समस्या आहे. कॅप्सूलचा हा पहिल्या प्रवास आहे. या कॅप्सूलमध्ये एक-दोन नव्हे तर अनेक समस्या आहेत.

कॅप्सूल म्हणजेच स्टारलाइनरमध्ये पाच ठिकाणी हीलियम वायूची गळती होत होती. हेलियम वाहनाच्या प्रणोदन प्रणालीला दाब पुरवतो. याशिवाय कॅप्सूलच पाच वेळा थ्रस्टर फेल्युअर झालंय. या दोन्ही गोष्टींमध्ये बिघाड झाल्यामुळे अंतराळयानाची नियंत्रण यंत्रणा खराब झालीय. म्हणजे सुनीता किंवा बॅरी पृथ्वीवर येताना वाहनावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. पृथ्वीच्या वातावरणात पोहोचण्याआधी असं झालं तर ते अवकाशात हरवतील. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर ते अंतराळयान अनियंत्रित होत खाली जमिनीवर पडेल.

अंतराळवीरांना वाचवण्यासाठी अमेरिकेकडे कोणते आहेत पर्याय?
नासा आपला जुना व्यावसायिक भागीदार SpaceX चे ड्रॅगन-2 कॅप्सूल एका नवीन रॉकेटसह अवकाशात पाठवले जाईल. या कॅप्सूलमध्ये चार प्रवासी बसू शकतात.
दोन अभियंत्यांनी हे कॅप्सूल स्पेस स्टेशनवर नेतील. अंतराळात ते थांबवल्यानंतर स्टारलाइनरमधील दुरुस्ती करायची.
त्यानंतर अंतराळवीर दोन्ही वाहनांमध्ये बसून पृथ्वीवर येतील. सुनीता विलिम्यस, बॅरी पृथ्वीवरून गेलेल्या दोन अभियंत्यांसह ड्रॅगन-२ मध्ये बसून परत येतील.
हे मिशन पूर्ण करण्यासाठी म्हणजेच सुनीता आणि बॅरी यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेला रशियाची मदत घ्यावी लागेल.
अशा स्थितीत जर रशिया-अमेरिकेला मदत करण्यास मदत तयार झालं, तर त्यामुळे ते ताबडतोब आपले सोयुझ अंतराळ यान अंतराळ स्थानकावर पाठवू शकतील. त्यानंतर सुनीता, बॅरी आणि अन्य एका प्रवाशाला खाली पृथ्वी आणू शकतील.
एक सोयुझ कॅप्सूल नेहमी स्पेस स्टेशनवर एस्केप क्राफ्ट म्हणून तैनात असते. आपत्कालीन स्थिती आल्यास अंतराळवीरांना पृथ्वीवर परत येण्यास मदत होऊ शकते.
किंवा अमेरिकेने आपल्या सर्व तक्रारी बाजूला ठेवून चीनची मदत घेऊ शकते. चीनने आपले शेनझोऊ अंतराळ यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवेल आणि तेथून दोघांनाही पृथ्वीवर परत आणता येईल.
दरम्यान युरोपियन स्पेस एजन्सी आणि इंग्लंड अद्याप कोणतीही मदत देण्याच्या स्थितीत नाहीत. सुनीता आणि बॅरीला परत आणण्यासाठी कमीत कमी एक महिना लागेल.
कारण युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे युरोपीय देशांची स्थिती वाईट झालीय.