US Presidential Debate : पहिल्या जाहीर वादविवादात ट्रम्प यांनी मारली बाजी?

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 6 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. प्रेसिडेन्शियल डिबेट दरम्यान सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष म्हणजेच जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प ही अमेरिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अस म्हंटल जाते की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण येतंय यावर जगातली राजकीय समीकरण अवलंबून असतात. यामुळे साऱ्या जागाच लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. या डीबेट मध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली ही जाणून घेवूयात. 

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी बायडन यांनी काहीच केल नसल्याचा आरोप ट्रम्प  यांनी केला आहे. बायडन यांनी  युद्ध वाढवण्याचे काम केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युद्ध गुन्हेगार आहेत आणि त्यांना रशियाला सोव्हिएत समाजात बदलायचे आहे. जे वास्तव असणार नाही अस मत व्यक्त केल.  

ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटत मी राष्ट्राध्यक्ष असतो तर युद्ध झालं नसत अस वक्तव्य केलं. शिवाय इस्रायलच्या समर्थनार्थ पैशांबाबतही ट्रम्प यांनी प्रश्न विचारले. बायडन यांनी पॅरिस शांतता कराराचे कौतुक केले आहे. पॅरिस शांतता कराराबद्दल ट्रम्प म्हणाले की, यासाठी अमेरिकेला एक दशलक्ष डॉलर्सची किंमत मोजावी लागली तर भारतासारख्या देशांना काहीही द्यावे लागले नाही. तसेच आपल्या कार्यकाळात पर्यावरणाची स्थिती अतिशय चांगली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.  

तसेच या व्यतिरिक्त देश आणि जगाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये वाद विवाद आणि चर्चा झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महातवाच ठरणार आहे. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कधी?
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची २०२४ ची निवडणूक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रेसिडेन्शियल डिबेट सुरू आहेत. यामध्ये विजयी उमेदवार जानेवारी २०२५ पासून व्हाईट हाऊसमध्ये चार वर्षांसाठी पदभार स्वीकारेल. 

मतदान कोण करू शकतं?

जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय 18 किंवा त्याहून जास्त असेल, तर तुम्ही दर चार वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरता.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter