सीरियात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तीव्र संघर्ष सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या संघर्षात दोन दिवसांत तब्बल १ हजारांपेक्षा जास्त जण ठार झाले असल्याची माहिती सांगितली जाते. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या (SOHR) मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सने सीरियामधील सर्व संबंधित पक्षांनाही तात्काळ हिंसा थांबवण्याची विनंती केली आहे. ही विनंती नागरिक, नागरिकांच्या पायाभूत सुविधा आणि मानवीय अभियानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून केली आहे.सीरियासाठी संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक एडम अब्देलमुला आणि सीरियाच्या संकटातील क्षेत्रीय तज्ज्ञ रमनाथन बालाकृष्णन यांनी एक संयुक्त निवेदन केले आहे.
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. काही लोकांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी या संघर्षामुळे वीज आणि पाणी खंडित करण्यात आली आहे. या संघर्षात आणखी रक्तपात होण्याच्या भीतीने हजारो लोक जवळच्या डोंगरात पळून गेले, तर काहींनी ह्मीमिममधील रशियन हवाई तळावर आश्रय घेतला आहे.
अद्यापही सीरियात मोठ्या प्रमाणात तणाव आहे. अनेक ठिकाणी लूटमार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, समोर आलेल्या वृत्तानुसार या हिंसाचारात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी ७४५ नागरिकांपैकी बहुतेकांना जवळून गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.