सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि युक्रेनियन शिष्टमंडळात झालेली बैठक.
नुकतेच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि युक्रेनियन शिष्टमंडळाने युक्रेनमध्ये ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली आहे. मोहम्मद बिन सलमान यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, यूक्रेनने अमेरिकेच्या ३० दिवसांच्या संघर्षविरामाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव यूक्रेन आणि अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या सौदी अरेबियामध्ये झालेल्या महत्त्वाच्या शांतता चर्चेनंतर मांडण्यात आला.
झेलेन्स्की यांनी सांगितले की, हा संघर्षविराम फक्त हवाई आणि समुद्रातील लढाईवरच नाही, तर रशियाशी होणाऱ्या युद्धातील संपूर्ण फ्रंटलाइनवर लागू होईल. यूक्रेनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. आम्ही या प्रस्तावाला सकारात्मक मानतो. आता अमेरिका रशियाला या संघर्षविरामाचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करेल.”
यूक्रेन आणि अमेरिकेने जेद्दाहमधील चर्चेनंतर संयुक्त निवेदन जाहीर केले. यामध्ये यूक्रेनला तत्काळ गुप्तचर माहिती पुरवली जाईल आणि अमेरिकेने सुरक्षा सहाय्य पुन्हा सुरू केले आहे असे सांगितले.
यूएसचे सचिव मायकल रुबिओ यांनी या चर्चेनंतर सांगितले की, आता हे युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्याची जबाबदारी रशियावची आहे. आशा आहे की रशिया हा प्रस्ताव मान्य करेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षविरामाच्या घोषणेचे स्वागत केले. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले, "आशा आहे की पुतिन हे या प्रस्तावाला स्वीकारतील."
युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याने सुमारे २०% भूभाग ताब्यात घेतला आहे. तसेच, युक्रेनने अलीकडेच रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनने ३३७ ड्रोन फेकले होते. यात ९१ ड्रोन मस्को प्रदेशा गेले. या हल्ल्यात ३ जण ठार तर ६ जण जखमी झाले.
या प्रस्तावाचे स्वागत युरोप आणि ब्रिटननेही केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या सहमतीला महत्त्वपूर्ण प्रगती मानले. तसेच त्यांनी युक्रेन आणि अमेरिकेच्या नेत्यांना अभिनंदन केले.
त्यानंतर, युरोपियन देशांनीही या संघर्षविरामाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, रशियावर त्याचे पालन करण्याची जबाबदारी ठेवली आहे. ही घटना शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून रशिया यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter