सौदी अरेबियामध्ये काल शुक्रवारी हिजरी कॅलेंडर(इस्लामिक कॅलेंडर) नुसार या वर्षाच्या रमजान महिना सुरू झाला आहे. रमजान महिन्याच्या सुरुवातीसाठी काल सौदी अरेबियामध्ये चंद्रदर्शन (चांदरात) झाले.
सौदीच्या सुप्रीम कोर्टाने जाहीर केले की, शनिवार १ मार्चला रमजान महिन्याचा पहिला रोजा (उपवास) असेल. तसेच तरावीहची नमाज शुक्रवारी २८ फेब्रुवारीला इशाच्या नमाजानंतर (संध्याकाळी ८:३० ची नमाज) सुरू होईल.
सौदी अरेबियाच्या पवित्र मशिदीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर याविषयी सांगितले आहे. त्यांनी लिहले, “सौदी अरेबियामध्ये रमजानचे चंद्रदर्शन झाले आहे. शनिवार १ मार्च हा रमजान १४४६ हिजरीचा पहिला दिवस असेल.”
येथील मीडियाने सांगितले की, तामीर ऑब्जर्वेटरीमध्ये ढग असल्याने चंद्रदर्शनावर तात्पुरती अडचण आली होती. परंतु काही वेळात ढग विरळ झाले आणि चंद्रदर्शन झाले.
बुधवारी २६ फेब्रुवारीला सौदी अरेबियाने मुस्लिमांना रमजान महिन्याच्या चंद्रदर्शनासाठी आवाहन केले होते. इतर देशांनी १ मार्चला रमजान महिन्याची सुरूवात केली आहे.
भारतात काल चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे भारतात रमजानचा पहिला उपवासाचा २ मार्चला असेल. नुकतेच एका कार्यक्रमातून प्रधानमंत्री मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा देतो.”
रमजान हा जगातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या पवित्र महिन्यात, मुस्लिम लोक सूर्य उगवण्यापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. अल्लाहचे स्मरण आणि प्रार्थना करतात. तसेच गरजूंच्या मदतीसाठी मोठे दान करतात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter