गाझाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवला 'हा' वादग्रस्त तोडगा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नुकतेच माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ट्रम्प यांनी जॉर्डनचे प्रमुख अब्दुल्ला दुसरे आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह अल-सीसी यांना गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांचे स्थलांतर करण्याबाबत चर्चा केली होती.

ट्रम्प म्हणाले, "मी जॉर्डनच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की पॅलेस्टिनी नागरिकांना जॉर्डनमध्ये आश्रय द्या. सध्या गाझामध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गाझा हे उध्वस्त झाले आहे. यावर जॉर्डन सरकारने तात्काळ प्रतिक्रिया देत पॅलेस्टिनी नागरिकांना जॉर्डनमध्ये आश्रय देण्यास स्पष्टपणे नकार दिला.” 

याविषयी जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनी सांगितले, "आमचे स्पष्ट मत आहे की, पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या भूमीवरच राहायचे आहे. गाझामध्ये राहणे हा पॅलेस्टिनी लोकांचा हक्क आहे."

तसेच, इजिप्तनेही ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा विरोध केला आहे. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, "पॅलेस्टिनी लोकांच्या बळजबरीने स्थलांतरामुळे संघर्ष अधिक तीव्र होईल. यामुळे मध्यपूर्वेत असलेल्या अस्थिरतेला आणखी खतपाणी मिळेल, आणि जगभरातील शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का लागेल."

ट्रम्प यांचे विधान अमेरिकेच्या धोरणात एक मोठा बदल दर्शवते असे काही विश्लेषक मानतात. २०२०च्या कार्यकाळात, ट्रम्प प्रशासनाने इस्राईल आणि पॅलेस्टिनी संघर्षावर इस्राईलच्या बाजूने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये पॅलेस्टिनी प्रदेशावर इस्राईलचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने काही धोरणांची शिफारस केली होती. यामध्ये येरुशलमला इस्राईलची राजधानी मानण्याऱ्या धोरणाचा  समावेश होता. 

पॅलेस्टिनी नेत्यांनी ट्रम्पच्या या विधानाचा तीव्र विरोध केला आहे. हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विधानाला पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांची निंदा करणारा आणि जातीय शुद्धता (एथनिक क्लिन्सिंग) असल्याचे सांगितले. यामुळे पॅलेस्टिनियन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

या संदर्भात, इतर देशांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. जॉर्डन आणि इजिप्त या दोन्ही देशांनी म्हटले की, पॅलेस्टिनी लोकांचे स्थलांतर हे गाझा व पश्चिम किनारा क्षेत्रातील संघर्षाचे निराकरण नाही. या देशांनी संयुक्त राष्ट्रांना आणि अन्य आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

ट्रम्पच्या या विधानामुळे एकदा पुन्हा एकदा मध्यपूर्वेतील स्थिती आणि इतर देशांच्या भूमिकांबाबत चर्चा सुरू झाली आहे. पॅलेस्टिनी संकटाच्या निराकरणासाठी दोन-राज्य उपाय योजना कायम राहील का? मध्यपूर्वेतील शांततेसाठी पुढील उपाययोजना काय असतील  हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter