शर्थीचे प्रयत्न करणाऱ्यांचे सुनिता विल्यम्स यांनी मानले आभार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 19 d ago
सुनिता विल्यम्स
सुनिता विल्यम्स

 

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या सहकारी अंतराळवीर बुच विल्मोरसह अंतराळात अडकल्या आहेत. या दोघांना अवकाशात जाऊन काल सहा महिने झाले आहेत. पृथ्वीवर परतण्यासाठी त्यांना अजून दोन महिने बाकी आहेत. दोघेही बोईंगच्या नवीन स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून 5 जून रोजी अंतराळात गेले. ते एका आठवड्यात परतणार होते, परंतु स्टारलाइनर अंतराळ यानामध्ये बिघाड झाल्यामुळे दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत.

सुनीता आणि विल्मोरच यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी राबविली जात आहे ही विशेष मोहिम

नासाने अंतराळयान परतीच्या उड्डाणासाठी खूप धोकादायक असल्याचे सांगितले आहे, म्हणून सुनिती विल्यम्सला पृथ्वीवर परत येण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. नासाने सुनीता आणि विल्मोर यांच्या परतीसाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परतण्यासाठी SpaceX Crew-9 मिशन 28 सप्टेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आले. त्यात दोन अंतराळवीरांना पाठवण्यात आले आहे, जेणेकरून ते परतताना सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणू शकतील.

सुनीता विल्यम्सने केला नवा विक्रम 
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून 2024 रोजी अंतराळ कक्षेत पोहोचले होते. यासह सुनीता विल्यम्सने बोईंगची नवीन स्टारलाइनर क्रू कॅप्सूल उडवणारी पहिली व्यक्ती बनून विक्रम आपल्या नावावर केला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही अनुभवी अंतराळवीर आहेत जे यापूर्वी अंतराळ स्टेशनवर राहिले आहेत. या दोघांनी यापूर्वीही वैज्ञानिक प्रयोगांमध्ये मदत केली होती. सुनीता विल्यम्स यांनी सप्टेंबरमध्ये स्टेशन कमांडर म्हणून पदभार स्वीकारला.

जगात चांगुलपणा अजूनही जिवंत आहे
सुनिता यांनी सांगितले की, माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर भारतीय सणांची शिकवण देऊन आमची सांस्कृतिक मुळे जपली. दिवाळी हा आनंदाचा सण आहे कारण यामुळे जगात चांगुलपणाचा प्रसार होतो. आज आपल्या समुदायासोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल आणि आपल्या समाजाचे अनेक योगदान ओळखल्याबद्दल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे आभार व्यक्त करीत असल्याचे त्या म्हणाल्या.