अखेर भूलोकी परतले सुनीता विल्यम्स आणि सहकारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 10 d ago
अंतराळातून परतल्यानंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स.
अंतराळातून परतल्यानंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स.

 

१९ मार्च २०२५ रोजी पहाटे ३:२८ वाजता, क्रू-९ मोहिमेतील चार अंतराळवीर – सुनीता विल्यम्स, निक हेग, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि बुच विल्मोर यांनी यशस्वीरित्या पृथ्वीवर परत येत आपला ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला. स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने चारही अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले गेले.

पृथ्वीवर परतल्यानंतर, जगभरातील अंतराळप्रेमींनी हा ऐतिहासिक क्षण आनंदाने साजरा केला. सुनीता विल्यम्स फक्त आठ दिवसांसाठी अंतराळात गेल्या होत्या, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्या ९ महिने अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून राहिल्या.

अंतराळातील विक्रम
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ मोहिमांमध्ये अनेक विक्रम केले आहेत. २००७ मध्ये त्या अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. त्यांनी अंतराळ स्थानकाच्या ट्रेडमिलवर बॅस्टन मॅरेथॉनची ४२.२ किलोमीटरची शर्यत पूर्ण केली. त्यांना वजनविहीन स्थितीत धावण्यासाठी हार्नेस आणि बंजी कॉर्डसचा वापर करावा लागला. त्यांच्या या उपक्रमाने अनेक लोकांना प्रेरणा दिली.

अंतराळातील मॅरेथॉन
२००७ मध्ये सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून मॅरेथॉन धावली. त्या बॅस्टन मॅरेथॉनसाठी अधिकृतपणे नोंदणीकृत होणाऱ्या पहिल्या अंतराळवीर होत्या. या स्पर्धेच्या दिवशी, बॅस्टनमध्ये २०,००० धावपटू रस्त्यावर धावत होते, तर विल्यम्स आयएसएसमधील ट्रेडमिलवर धावत होत्या. त्यांनी ४ तास २३ मिनिटे १० सेकंदांत शर्यत पूर्ण केली.

२००७ मध्ये परतताना अडचणी
२००७ मध्ये सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५ दिवसांचा ऐतिहासिक अंतराळ प्रवास पूर्ण केल्यानंतर स्पेस शटल अटलांटिसद्वारे पृथ्वीवर परत येण्याची तयारी केली होती. परंतु त्यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या. अंतराळ स्थानकापासून शटल वेगळे होत असताना आयएसएसच्या संगणकीय प्रणालीमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणालीतील समस्या सोडवण्यासाठी नासा अभियंत्यांनी मोठा प्रयत्न केला.

पृथ्वीवर परतल्यानंतरचे आव्हान
९ महिन्यांच्या शून्य गुरुत्वाकर्षणानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणे विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक ठरले. यानाच्या लँडिंगवेळी तीव्र 'जी-फोर्स'मुळे शरीराला अचानक भार जाणवू लागला.

विल्यम्स यांनी त्या क्षणाची आठवण सांगताना म्हटले की, "माझ्या शरीराला इतकी जडत्व जाणवत होती की हात उचलणेदेखील कठीण जात होते. वजनविहीनतेत राहून सवय झालेल्या शरीरासाठी पुन्हा गुरुत्वाकर्षण स्वीकारणे खूप मोठे आव्हान होते."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter