इमरान खान यांची राजकारणातील इनिंग संपुष्टात?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
इमरान खान
इमरान खान

 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी कमी होतांना दिसत नाहीये. आता पाकिस्तान सरकारने इमरान खान यांच्या पक्ष पीटीआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षावर पाकिस्तान सरकार बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी दिलीय. पत्रकार परिषदेत बोलतांना तरार यांनी पीटीआयशिवाय देशाला पुढे नेण्याच्या गरजेवर भर दिला आणि ते म्हणाले, सरकारने पीटीआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. पुरावे बघता सरकारने हा निर्णय घेतलाय.

दरम्यान तरार यांच्या या वक्तव्यानंतर पीटीआयनेही प्रत्युत्तर दिलंय. कायदेशीर बाबींबाबत इमरान खानचे प्रवक्ते तरार नईम हैदर पंजुथा यांनी पत्रकार परिषदेला उत्तर देताना सांगितले, सरकारला पीटीआयवर बंदी घालण्याचा अधिकार नाहीये. जे लोक पीटीआयवर बंदी घालण्याबद्दल बोलत आहेत ते स्वतःची कबर खोदत आहेत, तुमच्या क्रूरतेमुळे तुम्हाला लोकांनी आधीच नाकारले आहे.", अशी त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केलीय.

पीटीआयवर बंदी घालण्यासाठी सरकार देशातील सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करतेय. बेकायदेशीर स्त्रोतांकडून परकीय निधी मिळवणं. गेल्या वर्षी लष्करी संस्थांवर हल्ले केल्याप्रकरणी पीटीईवर बंदी घालण्याची तयारी सुरू असल्याचं पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्तारउल्ला तरार म्हणाले.

इमरानने १९९६ मध्ये पक्ष केला स्थापन
पीटीआय पाकिस्तानमधील एक राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना इमरान खान यांनी १९९६ मध्ये केली होती. त्यानंतर पाकिस्तानात सर्वात प्रमाणात विस्तार होणारा पक्ष म्हणून पीटीआय उद्यास आला. २०१८ च्या निवडणुकीत इमरान खानचा पक्ष सत्तेवर आला होता, पण एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या विश्वासदर्शक ठरावात ते पराभूत झाले होते. पाकिस्तान सरकारने गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे पीटीआयकडून सांगण्यात येत आहे.