ले. जनरल इगोर किरीलोव
जनरल दर्जाच्या एका बड्या रशियन लष्करी अधिकाऱ्याची आज हत्या घडवून आणण्यात आली. येथील इमारतीबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये लपवून ठेवण्यात आलेल्या बाँबचा स्फोट घडवून आणण्यात आला. त्यात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी या लष्करी अधिकाऱ्याविरोधात गुन्हेगारी कारवायांचा आरोप करण्यात आला होता. युक्रेनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून संबंधित अधिकारी हा युद्ध गुन्हेगार होता असे युक्रेनकडून सांगण्यात आले. ले. जनरल इगोर किरीलोव असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते रशियन लष्कराच्या आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षण करणाऱ्या पथकाचे प्रमुख होते. किरीलोव हे कार्यालयामधून बाहेर पडताच बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या स्फोटामध्ये किरीलोव यांचा सहकारी देखील मरण पावला आहे. रशियन सरकारने या घटनेच्या उव्वस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
या स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की त्यामुळे शेजारील इमारतीच्या खिडक्या आणि काचेच्या दारांना देखील तडे गेले. या स्फोटाची काही छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली असून त्यात इमारतींचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसून येते, किरीलोव यांच्यावर ब्रिटन आणि कॅनडाप्रमाणे अन्य देशांनी निर्बंध लादले होते.
युक्रेनवरील हल्ल्याचे खरे सूत्रधार हे तेव असल्याचे बोलले जाते. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने किरीलोव यांच्याविरोधात गंभीर गुन्हेगारी कारवायांचा ठपका ठेवला होता तसेच चौकशीला देखील सुरुवात केली होती. युक्रेनवरील हल्ल्यासाठी त्यांनी बंदी घालण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. किरीलोव यांच्यावरील हल्ल्यामागे देखील युक्रेनच्याच गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. किरीलोव हे खऱ्या अथनि युद्ध गुन्हेगार होते त्यामुळे त्यांना मारणे है योग्यच होते असा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.
रासायनिक शस्त्रांचा वापर
रशियाने युक्रेनवर फेब्रुवारी २०२२ मध्ये पूर्ण ताकदीने हल्ला केला होता त्यानंतर जवळपास ४ हजार ८०० वेळा युद्धभूमीवर रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. युक्रेनच्या गुप्तचर संस्थेनेच त्याचा तपशील ठेवला होता. युक्रेनच्या युद्धभूमीवर रशियाकडून क्लोरोपिक्रिन या विषारी वायूचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये या वायूचा चापर करण्यात आला होता. आता युक्रेनच्या लष्कराविरोधात याच वायूचा वापर करण्यात आला आहे. रशियाने मात्र आपण रासायनिक वायूचा वापर केला नसल्याचे म्हटले आहे.
बायडेन यांचा निर्णय वेडेपणाचा : ट्रम्प
युक्रेनला रशियाच्या भूप्रदेशात सीमारेषा ओलांडून आत खोलवर हल्ले करण्यास अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांच्या वापराची परवानगी देणे, हा बायडेन प्रशासनाचा वेडेपणाचा निर्णय आहे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी व्यक्त केले. सत्तेत आल्यानंतर या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सूतोवाचही ट्रम्प यांनी केले आहे.
रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेकडून युक्रेनला आर्मी टॅक्टिकल क्षेपणास्त्र यंत्रणा देण्यात आली असून, याचा वापर रशियाच्या सीमेपलिकडे आतपर्यंत करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी युक्रेनकडून वारंवार करण्यात येत होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत बायडेन प्रशासनाने नुकतीच युक्रेनला रशियामध्ये आतपर्यंत हल्ले करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, बायडेन प्रशासनाने युक्रेलला याबाबत परवानगी देण्याआधी सत्तेत येणाऱ्या आमच्या प्रशासनाशी चचदिखील केली नाही असे ट्रम्प म्हणाले. "मी सत्तेत येण्याच्या आधी आठवडाभर अशापद्धतीने निर्णय घेणे योग्य नाही. मी असा निर्णय घेऊ दिला नसता. माझ्यामते हा निर्णय म्हणजे मोठी चूक आहे," असे मत ट्रम्प यांनी पाम बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. युद्ध थांबविण्यासाठी वाटाघाटी कराव्यात असे आवाहनही ट्रम्प यांनी केले.
व्हाइट हाउसकडून प्रत्त्युत्तर
अमेरिकेत मागील महिन्यात निवडणूक झाली असली तरी युक्रेनला रशियाच्या सीमेच्या आतील भूभागावर हल्ला करण्यासाठी परवानगी देण्याबाचत गेल्या अनेक महिन्यांपासून विचारविनिमय सुरू होता, आणि यामागील कारणही आम्ही बायडेन यांना स्पष्ट केले आहे, असे स्पष्टीकरण व्हाइट हाउसच्या सुरक्षा विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दिले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter