रशिया-युक्रेन शांततेबाबत चर्चेला वेग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू असतानाच दोन्ही देशांदरम्यान शांतता निर्माण व्हावी यासाठीच्या प्रयत्नांना वेग आला आहे. अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींची आजपासून सौदी अरेबियामध्ये बैठक सुरू झाली आहे. याआधी अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये अंशतः शखसंधीबाबत चर्चा झाली आहे. 

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे शांतता चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अमेरिकेने ठेवलेला शांततेचा प्रस्ताव युक्रेन आणि रशियाला मान्य झाल्यानंतरच चर्चा सुरू झाली आहे. युक्रेनच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केल्यानंतर अमेरिकेचे प्रतिनिधी आता रशियाबरोबर चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेनने दीर्घ पल्ल्यावरील हल्ले थांबवावेत, युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांवर होणारे हल्ले रशियाने थांबवावेत आणि काळ्या समुद्रातील संघर्ष थांबवून व्यापारमार्ग खुला करावा, या मुद्दयांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. या अंशतः शस्वसंधीसाठी युक्रेन आणि रशिया तयार असले तरी काही मुहघांवर दोन्ही देशांच्या भूमिका वेगळ्या आहेत. 

दरम्यान, शस्त्रसंधीच्या प्रयत्नांत अडथळे आणत असल्याचा आरोप दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. अद्याप रशिया आणि युक्रेन यांच्यात थेट चर्चा झालेली नाही. युक्रेनमधील पायाभूत सुविधा आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ले होऊ नयेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तर, रशिया फक्त ऊर्जा केंद्रांवरील हल्ले थांबविण्यास तयार आहे, युक्रेनला मात्र ऊर्जा केंद्रांबरोबरच रेल्वे आणि बंदरांवरील हल्ले रोखले जावेत, असे बाटत आहे.

रशियाकडून कारस्थान : ऑस्ट्रिया 
युक्रेनबाबत अफवा पसरविण्याचे रशियाचे कारस्थान उघड झाले असल्याचा दावा ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. रशियासाठी हेरगिरी करत असलेल्या एका महिलेला मागील वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रियाच्या पोलिसांनी अटक केली होती. तिच्या चौकशीतून ही बाब उघड झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या महिलेच्या घरात काही उपकरणे सापडली असून त्यांच्या तपासातून बरीच माहिती समोर आली. २०२२ मध्ये युक्रेनवरील हल्ल्यांनंतर रशियाच्या गुप्तचर विभागाने जर्मन भाषेतून युक्रेनबाबत चुकीची माहिती पसरविण्यास सुरुवात केली, असे ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.