पाकिस्तानने पोसला काश्मीरमध्ये दहशतवाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 16 d ago
UNGAमध्ये काश्मीरच्या मुद्यावरून भारताने पाकिस्तानला सुनावले.
UNGAमध्ये काश्मीरच्या मुद्यावरून भारताने पाकिस्तानला सुनावले.

 

युएनजीएमध्ये पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र सचिव तेहमीना जनजुआ यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उचलला. त्यांच्या या व्यक्तव्याला भारताच्या संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी राजदूत पी. हरिश यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानच्या तेहमीना जनजुआ यांनी काश्मीरचा संदर्भ देत असताना राजदूत हरिश म्हणाले, "पाकिस्तानचा काश्मीर संदर्भ न दिसणारा आणि निराधार आहे. अशा वारंवार केलेल्या आरोपांमुळे पाकिस्तानचा दावा सिद्ध होणार नाही. त्यांच्या सीमा ओलांडून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न सुद्धा योग्य ठरवला जाणार नाही." यावेळी हरिश यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप करत त्याच्या धोरणांना चुकीचे ठरवले. आणि सांगितले की काश्मीर हा कायम भारताचा भाग आहे आणि तो राहिलं.  

पाकिस्तानच्या धर्मांध मानसिकतेचा उल्लेख करतांना हरिश म्हणाले, "पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर धार्मिक असहिष्णुता आणि त्यांचा भडकवणारा धर्मांध दृष्टिकोन सगळ्या जगाला माहीत आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवण्याचे काम केले आहे. पाकिस्तानच्या या पद्धतीला कधीही स्वीकारता येणार नाही."  

पाकिस्तानच्या भडकवणाऱ्या आरोपांवर त्याचवेळी हरिश यांनी एक वैश्विक दृष्टिकोन मांडला. "आंतरराष्ट्रीय इस्लामोफोबिया दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी धर्मनिरपेक्षतेच्या आणि धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीत एक ठोस प्रयत्न करायला हवे. या समस्येवर संयुक्त प्रयत्न हेच एकमेव उपाय ठरू शकतात," असे ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, "सर्व देशांनी आपल्या नागरिकांना समान अधिकार देण्याची शपथ घेतली पाहिजे. शिक्षणात एकमेकांमध्ये भेदभाव किंवा द्वेष रुचवणाऱ्या विचारधारेला कधीही परवानगी देऊ नये."

भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधी देशांकडून काश्मीरच्या मुद्यावर केले जाणारे आरोप प्रत्येकवेळी धुडकावले आहेत. भारताने नेहमीच काश्मीर हा त्याचा आंतरिक विषय असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला दहशतवादाच्या समर्थनाचा आणि सीमा ओलांडून अशांतता पसरवण्याचा आरोपही भारताने केले आहे. भारताने युएनजीएमध्ये स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तानचीच आहे. त्यावर गप्प बसून काश्मीरचा मुद्दा उचलणं हा मूर्खपणा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter