पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिमस्टेक देशांच्या संमेलनामध्ये सदस्य देशांना यूपीआय पेमेंट प्रणाली उपलब्ध करून देण्याबरोबरच 'बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स'च्या उभारणीचा प्रस्ताव दिला आहे. या माध्यमातून संघटनेच्या सदस्य देशांतील सहकार्याची भावना अधिक वृद्धिंगत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांनी आज बिमस्टेक देशांच्या सहाव्या संमेलनामध्ये बोलताना बहुक्षेत्रीय सहकार्याचा पुनरुच्चार केला. या संमेलनास थायलंडचे पंतप्रधान पेतोंगथान शिनवात्रा हे देखील उपस्थित होते. यंद्राच्या 'विमस्टेक' संमेलनाचे यजमानपद है थायलंडकडे आहे. उद्योगक्षेत्रातील सहकार्याबरोबरच सदस्य देशाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यासारख्या विविध उपक्रमांचा मोदी यांनी यावेळी उलेख केला, युवकांसाठी 'विमस्टक अॅथलेटिक्स' संमेलनाची घोषणाही त्यांनी केली. तसेच २०२७ मध्ये बिमस्टेक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
याच संमेलनामध्ये 'बँकॉक व्हिजन २०३०' चा स्वीकार करण्यात आला. मोदींनी सागरी वाहतूक कराराची घोषणाही केली. या संमेलनामध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओलो, भूतानचे पंतप्रधान त्येरिंग तोबगे, बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहंमद युनूस आणि म्यानमारचे लष्करी नेते जनरल मिन आँग हालियांग हे सहभागी झाले होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये मदत आणि पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी तसेच विविध देशांतील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी 'बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट'च्या स्थापनेचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींनी सादर केला.
या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख मोहंमद युनूस यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. बांगलादेशातील शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. पंतप्रधानांनी या बैठकीमध्ये अल्पसंख्याकाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याचे समजते.
मोदी श्रीलंकेत दाखल
थायलंड दौरा आटोपून पंतप्रधान मोदी रात्रीच श्रीलंकेला रवाना झाले. परराष्ट्रमंत्री विजिया हेरायब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांचे येथील विमानतळावर स्वागत केले. मोदी हे अध्यक्ष अनुराकुमार दिसनायके यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. दहा प्रमुख क्षेत्रांतील सहकार्याचा आराखडा यावेळी निश्चित करण्यात येईल असे सांगण्यात आले.
प्रस्तावित मुद्दे
- नॅनो उपग्रहाचे उत्पादन आणि प्रक्षेपण, रिमोट सेन्सिंग डेटाच्या वापरासाठी ‘बिमस्टेक’ देशांमध्ये केंद्रउभारणीचा प्रस्ताव
- ‘बिमस्टेक’ देशांतील विद्यार्थ्यांना भारतातील वन संशोधन संस्थेमध्ये आणि नालंदा विद्यापीठात शिष्यवृत्ती
- पारंपरिक औषधांसाठी भारतात केंद्र
- विद्याुत ग्रिड आंतरजोडणीचे काम जलदगतीने व्हावे
- ‘बिमस्टेक’ अॅथलेटिक्स परिषद यंदा भारतात होणार
- परस्परसंपर्क अधिक मजबूत व्हावा, यासाठी पारंपरिक संगीत उत्सव यंदा भारतात होणार