आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. हा दौरा २१1 ते २४ सप्टेंबर २०२४ दरम्यान होणार आहे. या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि बैठकांचा समावेश आहे. अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाचा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असताना पंतप्रधान या दौऱ्यावर जात असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
असा असेल पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा
क्वाड शिखर परिषदेचे आयोजन (२१ सप्टेंबर):
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची सुरुवात अमेरिकेच्या डेलावेअर राज्यातील क्वाड शिखर परिषदेत होईल, जिथे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे नेते एकत्र येऊन सुरक्षा, तंत्रज्ञान, आणि इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या विषयांवर चर्चा करतील.
भारतीय वंशाच्या समुदायाशी संवाद (२२ सप्टेंबर):
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदी भारतीय अमेरिकन समुदायाशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम भारतीय आणि अमेरिकन संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.
संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सहभाग (२३ सप्टेंबर):
युनायटेड नेशन्सच्या "Summit for the Future" मध्ये मोदी यांचे भाषण होईल, जिथे ते टिकाऊ विकास आणि जागतिक आव्हानांवर चर्चा करतील.
या दौऱ्यात विविध द्विपक्षीय बैठकाही होणार आहेत ज्यामध्ये जागतिक नेते आणि अमेरिकेतील प्रमुख व्यवसायिकांशी चर्चा होईल. या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.