म्यानमारमध्ये मागील आठवडयात आलेल्या ७.७ रिश्टर स्केल एवख्या तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे मृत्युमुखी पडणान्यांची संख्या २००० वर पोचली आहे तर चार हजारांच्या आसपास लोक जखमी झाले आहेत. शिवाय अडीचशेहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती म्यानमारमधील सरकारने दिली.
म्यानमारमधी विनाशकारी भूकंपामुळे न्यापीताव आणि गंडालेमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच साठहून अधिक मशिदी उद्ध्वस्त झाल्या आहेत. मंडाले येथील एका मठाबर इमारत कोसळली. यावेळी मठारा २७० भिक्खू होते. यातील ७० जण बचावले आणि ५० जणांचे मृतदेह हाती लागले. अद्याप १५० जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार मृतांचा आकडा आणखी अधिक असण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे देशातील तीन रुग्णालय पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. ठिकठिकाणी असणारे खड्डे आण जागोजागी असलेले बिगारे पाहता मदतकार्याला उशीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंतरराष्ट्रीय मदत
भारत, चीन, रशिया आणि आग्नेय आशियायी देशांकडून म्यानमार आणि धायलंडमध्ये मदतकार्य राबविण्यात येत आहे. युरोपियन युनियन, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि न्यूझोलंडने आर्थिक मदतीची घोषणा वेली. अमेरिकेकडून अद्याप थेट मदतीची घोषणा झालेली नाही. म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी चूकंपानंतर सहा प्रांतात आण्णीयाणी जाहीर करण्यात आली आहे.
मंडालेजवळील एका गावातील ८० टक्के इमारती कोसळल्या आहेत. दळणवळण यंत्रणा उप्प असल्याने नुकसानीची माहिती उशिराने हाती लागत आहे, ज्या भागात नुकसान कर्मी झाले, तेथेही भूस्खलनामुळे मदतकार्याला अडथळे येत असल्याचे चित्र आहे. मंडाले शहरातील विमानतळ आणि अन्य पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
७०० हून अधिक भाविकांचा मृत्यू
म्यानमारमध्ये शुक्रवारी विनाशकारी भूकंप आल्यानंतर मोठया प्रमाणात जीवितहानी झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात शुक्रवारी नमाज पठणाच्या वेळी भूकंप आल्यामुळे सुमारे ७०० हून अधिक मुस्लिम भाविकांचा मृत्यू झाला, असे स्प्रिंग रिवोल्यूशनरी म्यानमार मुस्लिम नेटवर्क संघटनेने सांगितले आहे. देशातील मृतांचा अधिकृत आकडा दोन हजारांच्या आसपास पोचला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक इमारती कोसळताना आणि लोक भयभीत होऊन पळताना दिसत आहेत.
विनाशाचा अंदाज नाही
म्यानमारमध्ये भूकंपामुळे नक्की किती हानी झाली, याचा पुरता अंदाज आला नसल्याचे आंतरराष्ट्रीय बचाव समितीचे उपसंचालक लारेल फरुरी यांनी सांगितले, फक्त मंडालेचा विचार केल्यास या शहरातील ८० टक्के इमारती कोसळल्या आहेत किंवा त्यांची पडझड झाली आहे. येथील दूरसंचार यंत्रणा कोलमडली असल्याने निश्चित माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. मा शहरातील मोठी तौन रुग्णालयेही भूकंपात पहली असून इतर २२ रुग्णालयांचेही नुकसान झाले आहे.
जखमींची संख्या मोठी असली तरी शस्त्रक्रिया, रक्त संक्रमण, भूल देणे या आणि इतर उपचारांसाठी पुरेशी वैद्यकीय साधने आणि उपकरणे नाहीत. म्यानमारमध्ये दहा हजारांहून अधिक इमारती कोसळल्या आहेत. एका प्राथमिक शाळेची इमारत कोसळून ५० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचाही मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.