भारताकडून पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी मोठी आर्थिक मदत

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेल्या काही काळापासून इस्राइल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. युद्धामुळे गाझापट्टीवर तणावाच वातावरण आहे. प्रसंगी गाझामध्ये नागरिकांकडून निदर्शने सुरू आहते. या दारम्यानच भारताने पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्र मदत आणि कार्य संस्था (UNRWA) ला  २५ लाख डॉलर एवढी  आर्थिक मदत जाहीर केली आहे. २०२४-२५  मध्ये पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करण्यासाठी हा पहिला हप्ता भारताने जारी केला आहे.

भारत पॅलेस्टाईनला सातत्याने मदत करत आहे. गेल्या वर्षीही भारताने पॅलेस्टिनी निर्वासितांना ५० लाख डॉलर्सची मदत केली होती. यावर्षीही भारत UNRWA मार्फत पॅलेस्टिनी निर्वासितांना ५० लाख डॉलर्सची मदत करणार असून  २५ लाख डॉलर्सचा हा पहिला हप्ता आहे.   

नुकतीच न्यूयॉर्कमध्ये UNRWA द्वारे एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भारताने २०२४-२५  मध्ये पॅलेस्टिनी निर्वासितांना ५० लाख डॉलर्सची मानवीय मदत देण्याची घोषणा केली होती. भारताने आतापर्यंत पॅलेस्टिनी निर्वासितांना तीन करोड डॉलर्सची मानवीय मदत केली असून त्यांचे जीवनमान उंचवण्यास हातभार लावला आहे. भारताकडून ही मदतीची रक्कम थेट पॅलेस्टाईन प्राधिकरणाकडे न देता संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि कार्य संस्थेकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे. संयुक्त राष्ट्रांची ही संस्था १९५० पासून नोंदणीकृत पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी मदत कार्य करत आहे.

अनेक देश स्वेच्छेने या संस्थेकडे मानवीय मदतीसाठी पैसे पाठवतात. यात भारत देखील समाविष्ट आहे. गेल्या वर्षी देखील या एजन्सीला भारताकडून ५० लाख डॉलर्सची मदत देण्यात आली होती, त्यापैकी २५ लाख डॉलर्सचा पहिला हप्ता नोव्हेंबर २०२३ मध्ये आणि २५ लाख डॉलर्सचा दुसरा हप्ता डिसेंबर २०२३ मध्ये जाहीर करण्यात आला होता.

UNRWA पॅलेस्टिनींसाठी सतत काम करत आहे
गाझामध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू असताना, UNRWA संस्थेला काम करणे कठीण होते. असे असूनही, युनायटेड नेशन्स एजन्सी युद्धामुळे त्रस्त लोकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युनायटेड नेशन्स एजन्सीचे म्हणणे आहे की, “इस्रायलच्या नाकेबंदीमुळे गाझा पट्टीपर्यंत मानवतावादी मदतनी भरलेल्या ट्रकला पोहोचणे खूप कठीण आहे. त्यामुळे गाझामधील लोकांचे जगणे कठीण झाले आहे.”
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter