मार्क झुकरबर्ग बनला जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती

Story by  Sameer D. Shaikh | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
मार्क झुकरबर्ग
मार्क झुकरबर्ग

 

मार्क झुकरबर्ग गुरुवारी पहिल्यांदाच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. संपत्तीच्या बाबतीत त्यांनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले. मेटा प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये सतत वाढ झाल्यामुळे त्याच्या संपत्तीत ही वाढ झाली आहे. मेटाव्हर्स आणि एआयवर झुकरबर्गने मोठी गुंतवणूक केली.  या कृतीकडे सुरुवातीला घोडचूक म्हणून पाहिले जात होते. मात्र अलीकडच्या काही महिन्यांत त्याची ही खेळी यशस्वी ठरली आहे.

झुकरबर्गची संपत्ती पोहोचली २०६.२ बिलियन डॉलर्सवर 
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, झुकरबर्गची एकूण संपत्ती गुरुवारी २०६.२ अब्ज डॉलर्स या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. या वाढीमुळे तो संपत्तीच्या बाबतीत ॲमेझॉनच्या बेझोसपेक्षा $१.१ अब्जने पुढे गेला आहे. आता फक्त टेस्लाचे एलोन मस्क या बाबतीत त्याच्या पुढे आहेत. मस्कची  संपत्ती झुकरबर्गपेक्षा ५० अब्ज डॉलर्सने अधिक आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्ती
 
मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण काय?
दुसऱ्या तिमाहीतील विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले नोंदवल्यानंतर आणि AI चॅटबॉट्सला शक्ती देणाऱ्या मोठ्या भाषेच्या मॉडेल्सकडे वाटचाल केल्यानंतर मेटा शेअर्स २३% ने वाढले. गुरुवारी कंपनीचे शेअर्स $५८२.७७ च्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. मेटाने डेटा सेंटर्स आणि कॉम्प्युटिंग पॉवरवर खूप खर्च केला आहे. झुकरबर्ग एआय रेसमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीने इतर दीर्घकालीन प्रकल्पांवरही काम सुरू केले आहे. यामध्ये ओरियन ऑगमेंटेड रिॲलिटी ग्लासेसचाही समावेश आहे. कंपनीने गेल्या महिन्यात त्याची घोषणा केली होती.

२०२४ मध्ये झुकरबर्गच्या संपत्तीत वाढ  
मेनलो पार्क, कॅलिफोर्निया-आधारित कंपनीमध्ये १३% स्टेक असलेल्या झुकरबर्गच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत ७८ अब्ज डॉलरची  वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सद्वारे ट्रॅक केलेल्या जगातील ५०० श्रीमंत लोकांमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे. ४० वर्षीय झुकरबर्ग या वर्षी संपत्ती निर्देशांकात चार स्थानांनी वर आला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter