निवडणुकी आधी कमला हॅरिस- डोनाल्ड ट्रम्प आमने-सामने!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 7 d ago
USA election
USA election

 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. ५ नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये मतदान होणार आहे. त्याआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही उमेदवारांमध्ये आज प्रेसिडेन्शियल डिबेट होणार आहे. डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत आमनेसामने आहेत. पत्रकार डेव्हिड मुइर आणि लिन्से डेव्हिस हे निवेदन करत असलेल्या ही चर्चा एबीसी न्यूजवर आयोजित करण्यात आली असून दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.

कमला हॅरिस- ट्रप यांच्यामध्ये जाहीर चर्चा..
५ नोव्हेंबर रोजी अमेरिकन जनता त्यांचा पुढचा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करतील. या दिवसासाठी सुमारे दोन महिने उरले असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत आमनेसामने आले आहेत. यापूर्वी 2020 प्रमाणे ही निवडणूक माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरुन जोरदार घमासान झाल्याचे पाहाया मिळाले.

दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार घमासान..
''मी मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाली आणि मी निवडणुकीतील एकमेव उमेदवार आहे ज्यांच्याकडे अमेरिकन लोकांच्या प्रगतीची आहे. माझी एक अमेरिकन समुदाय तयार करण्याची योजना आहे. मी स्टार्टअपसाठी कर कमी करण्याचा विचार करत आहे, असे कमला हॅरिस म्हणाल्या. तसेच ट्रम्प यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही डबघाईला आणल्यानंतर पळ काढला," असे म्हणत जोरदार हल्ला चढवला.

"डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन सरकारवर टीका करताना अमेरिकेतील महागाई, गुन्हेगारी आणि चीनबाबत बायडेन सरकारची धोरणेही चुकीची आहेत, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला. तसेच कमला हॅरिस या मार्क्सवादी आहेत. त्यांचे वडील मार्क्सवादी असून त्यांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. "त्यांनी या विक्षिप्त धोरणाने आपला देश उद्ध्वस्त केला आहे," असे म्हणत थेट टीका केली. ट्रंप यांच्या या टीकेनंतर हॅरिस यांनीही चीन तुम्हाला चिप्स देत होते का? असा सवाल करत सडेतोड उत्तर दिले. त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, तेच गुन्हेगारीच्या बाता करत आहेत, असा टोलाही लगावला.

गर्भपाताच्या मुद्द्यावरुन वाद..
दरम्यान, या अध्यक्षीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात जोरदार वादावादी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भपात धोरणाचा बचाव केला आणि गर्भपातावरील 6 आठवड्यांच्या बंदीचे समर्थन केले. गर्भपाताबाबत डेमोक्रॅटची धोरणे तशीच राहिली आहेत, असे ट्रम्प म्हणाले. दुसरीकडे महिलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्काराचा उल्लेख करत हॅरिस यांनी ट्रम्प यांनी महिलांना त्यांच्या शरीराचे काय करावे हे सांगू नये. सरकार आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांनी त्यांच्या शरीराचे काय करावे हे सांगू नये, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर ते देशभरात गर्भपात बंदीच्या विधेयकावर स्वाक्षरी करतील, असा जोरदार पलटवार केला.