मॉरिशसमध्ये सुरू झाले जन औषधी केंद्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉरिशसमध्ये जन औषधी केंद्राचे उद्घाटन करताना
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉरिशसमध्ये जन औषधी केंद्राचे उद्घाटन करताना

 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच मॉरिशसमध्ये परदेशातील भारताच्या पहिल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले.

जयशंकर यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्यासमवेत जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले.

यानंतर एक्सवर पोस्ट करत जयशंकर म्हणाले “पंतप्रधान कुमार जगन्नाथ यांच्यासमवेत मॉरिशसमधील पहिल्या परदेशातील जन औषधी केंद्राचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हे औषधी केंद्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या वचनाची पूर्तता आहे.”

याआधी बुधवारी, जयशंकर यांनी मॉरिशसमधील ग्रँड बोईस येथे मेडिक्लिनिक प्रकल्पाचे उद्घाटनही केले, जे भारतीय अनुदान सहाय्याने बनवले गेले आहे आणि याला दोन राष्ट्रांमधील 'मैत्रीची नवीन अभिव्यक्ती' म्हटले आहे.

मॉरिशसमधील ग्रँड बोईस येथे प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जयशंकर म्हणाले की, "या उपक्रमामुळे ग्रँड पोईस परिसरातील १६,००० लोकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध होईल."

मॉरिशसच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले की, "जगातील कोणत्याही देशाला कोणत्याही बाबतीत भारताचा पाठिंबा हे विश्वासाचे प्रतीक बनले आहे."

रेडुइट येथील नागरी सेवा महाविद्यालयात बोलताना ते म्हणाले, "ज्यांनी या प्रकल्पाची जागा प्रत्यक्षात आणली त्यांच्याशी चर्चा करून आनंद झाला. भारतीयांची व्यावसायिक बांधिलकी वाखण्याजोगी आहे, ते सतत भारताला अभिमानास्पद बनवत आहेत."

पुन्हा एकदा देशाचे परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर प्रथमच एस जयशंकर मंगळवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर मॉरिशसला पोहोचले.

मॉरिशसशी आमचे घट्ट नाते असल्याचे ते म्हणाले होते. तसेच, ही भेट भारताची मॉरिशसशी असलेली अतूट बांधिलकी सिद्ध करण्याची संधी आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी मॉरिशसचे विरोधी पक्षनेते अरविन बौले यांच्याशीही भारत-मॉरिशस भागीदारीचे महत्त्व आणि देशासाठी त्याचे फायदे यावर चर्चा केली.