भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही) माध्यमातून आज युरोपीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ईएस) दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सुरुवातीला काही तांत्रिक अडथळ्यांमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते, पण आज सायंकाळी ४ वाजून ४ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अवकाशस्थानकावरून हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात करण्यात आले.
हे उपग्रह बुधवारीच अवकाशात सोडले जाणार होते पण त्यांच्या प्रॉपल्शन सिस्टिममध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांचे उड्डाण लांबणीवर टाकण्यात आले होते. 'इस्रो'च्या 'पीएसएलव्ही-५९' वा प्रक्षेपकाच्या माध्यमातून 'प्रोबा-३' या मोहिमेअंतर्गत दोन उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.
प्रोबा' हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ हा 'चला प्रयत्न करू' या असा होतो. भारताच्या व्यावसायिक अवकाश मोहिमेच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे दोन्ही उपग्रह सूर्याच्या बाह्य आवरणाचा अभ्यास करणार आहेत. या मोहिमेसाठी 'इस्त्रो'च्या न्यूजस्पेस इंडिया लि. या व्यावसायिक शाखेने पुढाकार घेतला होता.'
सौरभरारी बातमी
-
जगात प्रथमच दोन उपग्रहांच्या प्रयोगशाळेचे प्रक्षेपण करण्यात आले
-
अवकाशात कृत्रिम सूर्यग्रहण तयार करून सौर वातावरणाचा अभ्यास
-
प्रामुख्याने सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करणार