Mon Mar 31 2025 8:34:35 PM
  • Follow us on
  • Subcribe

इस्राईलकडून गाझामध्ये हवाई हल्ले सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 d ago
इस्राईलने हवाई हल्ला केल्यानंतर गाझापट्टीतील परिस्थिति.
इस्राईलने हवाई हल्ला केल्यानंतर गाझापट्टीतील परिस्थिति.

 

गाझामधील इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी तुटली आहे. यामुळे पुन्हा लष्करी कारवाया सुरू झाल्या आहेत. इस्राईलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले जानेवारीनंतरचे सर्वात गंभीर हल्ले मानले जात आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ल्याचे कारण स्पष्ट करत सांगितले की, “हमाससोबतच्या अयशस्वी चर्चांमुळे या हल्ल्याची आवश्यकता होती. आमचा उद्देश आहे गाझामध्ये सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. आम्ही केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.” 

हॅमासने या हल्ल्याच्या निषेध केला आहे. हमासने सांगितले की, इस्राईलने सीजफायरचे उल्लंघन केले आहे. त्यांनी युद्धविरामाचे पालन केले नाही आणि पुन्हा हल्ला करण्याचा निर्णय घेतला. इस्राईलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा वाढू शकते. यामुळे युद्धाचा धोका देखील वाढला आहे.

आमरिकेच्या व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव करोलिन लेविट यांनी सांगितले की, “या हल्ल्यांपूर्वी अमेरिकेने इस्राईलसोबत चर्चा केली होती. अमेरिकेने इस्राईलने केलेल्या कारवाईला समर्थन दिले असून, ट्रम्प प्रशासनाने हमास, हूथी आणि इराणविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.” 

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव करोलिन लेविट यांनी सांगितले की, "हल्ल्यांपूर्वी अमेरिकेने इस्राईलसोबत चर्चा केली होती आणि अमेरिकेने या हल्ल्याला समर्थन दिले आहे." अमेरिकेने ट्रम्प प्रशासनाच्या धोरणानुसार हमास, हूथी आणि इराणविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.

राजकीय विश्लेषक झेव्हियर अबू ईद यांनी सांगितले की, “गाझाच्या युद्धविराम चर्चेमध्ये मिस्र आणि कतारला ट्रम्प प्रशासनाला एक शक्तिशाली संदेश देणे आवश्यक आहे. यामुळे गाझाच्या पुनर्निर्माणाच्या प्रयत्नांचे नुकसान होईल. अमेरिकेने इस्राईलला समर्थन दिले असले तरी इतर देशांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा विरोध करणे गरजेचे आहे.”

या हल्ल्यानंतर हमासने संपूर्ण जगात इस्राईलच्या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. हमासने सांगितले की, इस्राईलने गाझावर पुन्हा हल्ला केला आहे. त्यामुळे मोठ्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

गाझामधील रहिवाशांना अन्न, इंधन, पाणी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा होतो आहे. यामुळे ते अधिक संकटात आहेत.  स्राईलचे संयुक्त राष्ट्रातील दूत डॅनी दानोन यांनी हल्ल्यांचे समर्थन केले आहे. इस्राईलने केलेल्या या हल्ल्यामुळे संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter