हल्ला केल्यास अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर - अयातोल्ला अली खामेनेई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आण्विक कराराच्या मुद्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर थेट बॉम्ब वर्षाव करण्याची धमकी दिल्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई यांनीही प्रतिहल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर त्यांना तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊ असे खामेनेई यांनी म्हटले आहे. 

आण्विक कराराच्या अनुषंगाने इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी अमेरिकेने तेथील सर्वोच्च नेतृत्वाकडे मार्च महिन्यामध्ये पत्राच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविला होता. यावर निर्णय घेण्यासाठी इराणला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या या धमकीला प्रत्युत्तर देताना खामेनेई यांनी म्हटले आहे की अमेरिका आणि इस्माईलसोबत आमचे फार पूर्वीपासून वैमनस्य आहे. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आम्हाला तरी ते शक्य वाटत नाही पण त्यांनी ही चूक केलीच तर आमच्या देशातील जनताच त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देईल यात शंका नाही असे खामेनेई यांनी म्हटले आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळेस इराण माघार घेणार नाही. 

मागील आठवड्यामध्ये या अनुषंगाने इराणचे अध्यक्ष मसूद पोसकियान यांनी अमेरिकेला पत्र पाठविले होते त्यात त्यांनी अणुकराराच्या अनुगंधाने ट्रम्प प्रशासनाशी कोणतीही भेंट बोलणी होणार नाही, खामेनेई सांगतील त्यानुसार पुढील पावले टाकण्यात येतील असे म्हटले आहे. इराणाच्या युरेनियम शुद्धीकरणाचा प्रकल्प अखेरच्या टप्प्यामध्ये असून लवकरच व अण्वस्व निर्मितीचा सप्पा गाठतील अशी शंका युरोषीय देशांना आहे. शाणने मात्र आमचा आण्विक प्रकल्प हा केवळ नागरी उद्देशानेच राबविला जात असल्याचे म्हटले आहे. 

क्षेपणास्त्र प्रणाली सज्ज 
अमेरिकेसोबतचा तणाव कोणत्याही क्षणी वाढू शकतो ही बाब लक्षात घेऊन इराणने भूमिगत क्षेपणास्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 
इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण असून युरेनिअम शुद्धीकरणाची खरी पातळी त्यांच्याकडून जाहीर केली जात नसल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेने विश्वास ठेवावा 
अमेरिकेसोबत अप्रत्यक्ष चर्चा करण्याला खामेनेई यांनी पाठिंबा दिला आहे. "आम्ही चर्चा टाळत नाहीत. त्यांचाच आमच्यावर विश्वास नसल्याने सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. आता अमेरिकेच्या बाजूने विश्वासार्ह बोलणी व्हायला हवी. ही बोलणी होईल याचा आम्हाला विश्वास आहे." असे अध्यक्ष पझेसकिवान यांनी म्हटले आहे.