फिनलँड आयटी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अभियांत्रिकी, गेम डेव्हलपमेंट आणि पोस्ट-डॉक्टरेट संशोधन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीय व्यावसायिकांसाठी नवीन करिअर संधी उपलब्ध होत आहे. या संधीबद्दल एक अधिकृत निवेदन नुकतेच जारी करण्यात आले आहे.
फिनलँड सरकारची बिझनेस फिनलँड ही अधिकृत संस्था आहे. ही संस्था व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष आणि प्रतिभेचा विकास करण्यासाठी काम करते. या संस्थेच्या माध्यमातून भारतीय व्यावसायिकांना फिनलंडमध्ये राहण्याबद्दल आणि काम करण्याबद्दल सर्व आवश्यक माहिती मिळेल.
फिनलंडच्या वरिष्ठ संचालक लॉरा लिंडे यांच्या मते, "फिनलंडमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेषत: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञानांमध्ये तज्ञ व्यावसायिकांची आवश्यकता आहे."
त्याचबरोबर तुलानेट संस्थेच्या कार्यकारी संचालक सन्ना मार्टिनेन यांनी सांगितले की, "फिनलंडमध्ये पोस्टडॉक्टरल संशोधकांसाठी नवीन कार्यक्रम सुरू केला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संशोधन आणि विकास क्षेत्रात आपले कार्य सुरू करू इच्छिणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना संधी दिली जाईल."
फिनलँड हे उच्च तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सर्जनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी इंग्रजी भाषेवर चांगली पकड असणे आवश्यक आहे. याशिवाय फिनलंडची स्थानिक भाषा शिकणे देखील फायद्याचे ठरू शकते.
फिनलंडमधील स्टार्टअप्स आणि टेक्नोलॉजी क्षेत्राने इंग्रजी बोलणाऱ्या व्यावसायिकांसाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध केल्या आहेत. तसेच, फिनलंडमधील प्रमुख उद्योगांमध्ये जैव अर्थव्यवस्था, स्वच्छ तंत्रज्ञान, आरोग्य आणि कल्याण, आयटी, डिजिटलायझेशन आणि गेम डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे.
फिनलंडमधील रोजगार संधींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकारचे संशोधन आणि विकास क्षेत्रातील योगदान. २०२५ ते २०२८ दरम्यान फिनलँड सरकार ४,००० युरोपर्यंत पगार देणाऱ्या पोस्टडॉक्टरल संशोधकांची भरती करणार आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी भारतीय व्यावसायिकांना उत्तम संधी मिळू शकते.
सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फिनलंडमध्ये काम करण्याची संधी असलेले भारतीय व्यावसायिक नवकल्पनांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता साधण्यासाठी आपला मार्ग ठरवू शकतात. यामुळे त्यांना आपला करिअर नवा आकार देण्याची संधी मिळेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter