भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 23 h ago
एस. जयशंकर आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर
एस. जयशंकर आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर

 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे UK दौऱ्यावर गेले आहेत. नुकतेच ते लंडनमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी भारत-ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

याविषयी माहिती देताना जयशंकर यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितले, “पंतप्रधान स्टारमर यांना भेटून आनंद झाला. यावेळी भेटीत त्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. आमचे द्विपक्षीय, आर्थिक सहकार्य पुढे नेणे आणि लोकांमधील देवाणघेवाण वाढवण्यावर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेन संघर्षाबद्दल यूकेचा दृष्टीकोन सांगितला.” 
या दौऱ्यावर जयशंकर यांनी यूकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची देखील भेट घेतली. या भेटीविषयी त्यांनी लिहले, “भारतातील चेव्हनिंग स्कॉलर्सना भेटून आनंद झाला. आपली प्रतिभा आणि लोकांमधील देवाणघेवाण याचे जीवंत उदाहरण आहे. हे नक्कीच भारत-ब्रिटन संबंधांना मजबूत करेल." 
 

त्यानंतर, व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांची परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार कराराबाबतची प्रगती सांगितली.

जयशंकर यांचा यूके दौरा ९ मार्चपर्यंत चालू राहील. या दरम्यान ते ब्रिटन आणि आयर्लंडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आयर्लंडमध्ये ६ आणि ७ मार्च रोजी त्यांच्या भेट होऊ शकते.  ते आयर्लंडचे परराष्ट्र मंत्री सायमन हॅरिस यांच्याशी भेटतील. तसेच, ते भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही संवाद साधतील.

भारत आणि आयर्लंड यांच्यात घटक लोकशाही मूल्ये, सांस्कृतिक संबंध आणि वाढती आर्थिक भागीदारी यावर आधारित मित्रत्वपूर्ण संबंध आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या भेटींमुळे भारताच्या यूके आणि आयर्लंडसोबतच्या संबंधांना नवीन चालना मिळेल.

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार  
या दौऱ्यादरम्यान भारत आणि यूकेमधील मुक्त व्यापार करारावर डेव्हिड लॅमी आणि एस. जयशंकर यांच्यात चर्चा होईल. गेल्या महिन्यात ब्रिटनचे व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स भारताला आले होते. यावेळी दोन्ही देशांनी पुन्हा करारावर चर्चा सुरू केली आहे. भारत आणि ब्रिटनमधील वाढती मैत्री पाहता, या बैठकीत संरक्षण, व्यापार, आरोग्य, शिक्षण, आणि सांस्कृतिक आदान-प्रदान यांसारख्या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष दिले जाईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्कीं यांच्यात २८ फेब्रुवारीला वाद झाला. या जोरदार वादविवादानंतचर एस. जयशंकर यांचा हा दौरा होणार आहे. सध्या झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातीव वादाची चर्चा जगभर सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये युरोपियन नेत्यांनी यूक्रेनला पाठिंबा देण्यासाठी एक बैठक घेतली होती. यादरम्यान एस. जयशंकर यांचा ब्रिटन दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter