इराण-इस्राईल युद्धात कोणाचे पारडे जड?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
 Iran-Israel war
Iran-Israel war

 

इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात तेल अवीवमध्ये २०० हून अधिक क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहच्या हत्येचा बदला घेतल्याचा दावा या हल्ल्यानंतर, इराणने केला असून युद्ध सुरूच राहील, असं म्हटले आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या दोन देशांमधील सामरिक क्षमता आणि सैन्य शक्तीचा आढावा घेऊया..

पश्चिम आशियातील सर्वात मोठं सैन्य
ग्लोबल फायरपॉवरच्या २०२४ निर्देशांकानुसार, इराणची लोकसंख्या इस्रायलपेक्षा दहा पट जास्त आहे. इराणची लोकसंख्या ८.७५ कोटी असून इस्रायलची लोकसंख्या ९०.४३ लाख आहे. पश्चिम आशियातील सर्वात मोठे सैन्य इराणकडे असून किमान ५,८०,००० सक्रिय सैनिक आणि सुमारे २,००,००० प्रशिक्षित राखीव सैनिक आहेत. इस्रायलच्या तुलनेत सैनिकांची संख्या अधिक असली तरी, इस्रायलकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि प्रशिक्षित सैनिकांचा ताफा आहे. इस्रायली सैन्य दलांमध्ये १,६९,५०० सैनिक असून, गरज भासल्यास राखीव दलात ४,६५,०००  सैनिक सज्ज आहेत.

२,००० किलोमीटरपर्यंत मारा करणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
इराणकडे प्रचंड प्रमाणात बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा साठा आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या अहवालानुसार, पश्चिम आशियातील सर्वात मोठा क्षेपणास्त्र साठा इराणकडे आहे. यामध्ये २,००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. दुसरीकडे, इस्रायलकडे हवाई क्षेत्रात प्रचंड ताकद आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या आकडेवारीनुसार, इस्रायलकडे एकूण ६१२ लढाऊ विमानं असून यात अत्याधुनिक एफ-१५, एफ-१६ आणि एफ-३५ सारख्या विमानांचा समावेश आहे. तर इराणकडे 551 लढाऊ विमानं आहेत, मात्र ती तितकी आधुनिक नाहीत.

नौदलात दोन्ही देश कमकुवत
वॉर टँकच्या बाबतीत बोलायचं झालं तर इराण या बाबतीतही पुढे आहे. इस्रायलकडे १,३७० टँक आहेत, तर इराणकडे १,९९६  टँक आहेत. मात्र, यापैकी इस्रायलकडे मर्कवा सारखे आधुनिक टँक आहेत. तसेच, नौदलाबद्दल बोलायचे झाले, तर या बाबतीत दोन्ही देश फारसे मजबूत नाहीत. नौदलाच्या बाबतीत ना इस्रायल फार मजबूत आहे, ना इराण. मात्र, इराणकडे लहान बोटी आहेत आणि त्यांच्याद्वारे मोठे हल्ले करू शकतो, असे सांगितले जात आहे. ग्लोबल फायरपॉवरनुसार, इराणच्या ताफ्यात अशा बोटांची संख्या ६७ आणि पाणबुड्यांची संख्या १९ आहे. तर इस्रायलकडे अशा १०१ बोटी आणि पाच पाणबुड्या आहेत.

सैन्य संरचने इराणला अमेरिकाही घाबरते
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार, या सैन्य संरचनेमुळेच इराणवर विरोधी देश अमेरिका आणि इस्रायल थेट हल्ला करण्याचे धाडस करत नाहीत. वास्तविक, पश्चिम आशियात ईराण प्रॉक्सी मिलिशियाच्या मोठ्या नेटवर्कला शस्त्रास्त्रे पुरवतो. त्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवतो. या प्रॉक्सी मिलिशियामध्ये लेबनॉनचा हिजबुल्लाह, यमनचा हूती, सीरिया आणि इराकमधील मिलिशिया गट तसेच गाझामधील हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांचा समावेश आहे.

हे सर्वसाधारणपणे इराणच्या सशस्त्र सैन्याचा भाग मानले जात नाहीत. तरीही, हे इराणकडून युद्धासाठी तयार असतात. हे इराणचे खूप विश्वासू आहेत. गरज पडल्यास हे सर्व एकत्र येऊन इराणला मदत करू शकतात. या धोक्याच्या दृष्टिकोनातून, इस्रायलने प्रथम गाझा पट्टीवर हल्ला केला आणि ११ महिने इतर कोणाकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर, गुप्तचर माहितीच्या आधारावर हिजबुल्लाहचा नायनाट करण्याची योजना आखली. त्याच्या प्रमुखाला ठार मारल्यानंतर यमनमधील हुती बंडखोरांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती, तेव्हाच इराणने प्रत्युत्तर दिले.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका अहवालानुसार, इस्रायलकडे सुमारे ८० अण्वस्त्र आहेत. यापैकी केवळ ग्रॅव्हिटी बॉम्बची संख्या ३० आहे. ग्रॅव्हिटी बॉम्ब विमानांद्वारे टाकता येऊ शकतात. तसेच, इस्रायलच्या ५० इतर परमाणु शस्त्रांवर हल्ला करण्यासाठी मध्यम अंतराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची गरज असेल. या क्षेपणास्त्रांद्वारे ५० परमाणु बॉम्ब सोडले जाऊ शकतात.

सैनिकांची संख्या कमी असली तरी प्रत्येक इस्रायली शस्त्र चालवण्यात निपुण इस्रायली सैन्य दलाबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे सेना, नौदल आणि अर्धसैनिक दलांमध्ये एकूण १,६९,५०० सैनिक आहेत. मात्र, इस्रायल आपले नागरिक प्रत्येक परिस्थितीसाठी तयार ठेवते. तिथे प्रत्येक नागरिकाला अनिवार्यपणे सैन्यात काम करावे लागते. त्यामुळे राखीव दलांमध्ये त्यांच्याकडे ४,६५,००० सैनिक आणि अर्धसैनिक दलांमध्ये ८,००० जवान राखीव आहेत. गरज पडल्यास इस्रायलमध्ये प्रत्येक सामान्य व्यक्ती शस्त्र उचलू शकतो.

हवेत मार करण्यासाठी इस्रायलकडे जास्त ताकद सैनिकांच्या बाबतीत इराण भारी पडताना दिसत असला तरी शस्त्रांच्या बाबतीत इस्रायल पुढे आहे. विशेषत: हवाई शक्तीमध्ये इस्रायलची स्थिती मजबूत आहे. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, इस्रायलकडे एकूण ६१२ लढाऊ विमानं आहेत. तर इराणकडे ५५१ लढाऊ विमानं आहेत. इस्रायलच्या वायु दलात अत्याधुनिक एफ-१५एस, एफ-१६एस आणि एफ-३५ एस सारखी लढाऊ विमानं आहेत. इराणची लढाऊ विमानं इतकी आधुनिक नाहीत.