हमास प्रमुख याह्या सिनवार इस्राईलच्या हल्ल्यात मृत्युमुखी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 h ago
इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू
इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू

 

इस्राईलविरोधात युद्ध पुकारणारा आणि गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर क्षेपणास्त्र डागणाऱ्या पॅलेस्टाईनच्या हमास या बंडखोर गटाचा प्रमुख आणि मास्टरमाईंड याह्या सिनवार ठार झाल्याची घोषणा इस्राईचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली आहे. 

इस्राई डिफेन्स फोर्सनं (IDF) सांगितलंय की, गाझामधील ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये हमासचा प्रमुख याह्या सिनवार याचाही समावेश आहे. IDF नं ट्विट करुन याची माहिती देताना म्हटलं की, आयडीएफ आणि आयएसए या दोन्ही संघटना मिळून याह्या सिनवारच्या मृत्यूची शक्यता तपासत आहेत.

गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये इस्राईलनं केलेल्या कारवाईत हिज्बुलचा प्रमुख हसन नसरल्ला याला हवाई हल्ल्यात ठार केलं होतं. तर काही दिवसांपूर्वीच हमासचा आणखी एक वरिष्ठ नेता इस्माईल हनियह याचा इराणमध्ये खात्मा करण्यात आला होता. इस्राईलनंच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तेहरान आणि हमासनं केला होता.

कोण होता याह्या सिनवार?
इस्माईल हनियाच्या हत्येनंतर हमासचे नेतृत्व याह्या सिनवारकडे आले होते. अबू इब्राहिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याह्या सिनवारचा जन्म गाझा पट्टीच्या दक्षिण भागात असलेल्या खान युनिस निर्वासित शिबिरात झाला.

याह्याचे आई-वडील अश्केलॉनचे होते, परंतु, जेव्हा १९४८ मध्ये इस्रायलची स्थापना झाली आणि हजारो पॅलेस्टिनींना त्यांच्या वडिलोपार्जित घरातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा याह्याचे पालकही निर्वासित झाले. पॅलेस्टिनी त्याला 'अल-नकबा' किंवा आपत्ती म्हणतात.

याह्या सिनवारला इस्रायलने १९८२ मध्ये पहिल्यांदा अटक केली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे १९ ​​वर्षे होते. याह्यावर 'इस्लामी कारवायांमध्ये' सहभागी असल्याचा आरोप होता. १९८५ मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. याच सुमारास याह्याने हमासचे संस्थापक शेख अहमद यासिन यांचा विश्वास जिंकला.