भारतीय-अमेरिकी गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ श्रेणीत जागतिक मान्यताप्राप्त ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या सोहळ्यात टंडन यांना दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वॉटर केलरगन आणि जपानी व्यायोलिन वादक एक मात्सुमोटो यांच्या सहकर्मीद्वारे हा पुरस्कार मिळाला.
ग्रॅमी पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजलीस मध्ये आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी रेकॉर्डिंग अकादमीने या प्रतिष्ठित पुरस्काराचे वितरण केले. उद्योगक्षेत्रात नेतृत्व करणान्या टंडन या पेप्सिको 'ग्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांच्या ज्येष्ठ भगिनी असून या पुरस्काराबदल त्यांनी आनंद व्यक्त केला.
टंडन यांचे ‘त्रिवेणी’ अल्बम गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरून प्रेरित आहे. यामध्ये विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे कलाकार सामील झाले. या अल्बममध्ये एकूण सात गाणी असून त्यात प्राचीन वैदिक मंत्रांचे सादरीकरण बासरीच्या मदतीने केले गेले आहे. टंडन यांनी या गाण्यांद्वारे सजगता, आत्मशोध आणि आध्यात्मिक एकतेला प्रोत्साहन दिले आहे.
‘त्रिवेणी’ हे अल्बम ऑगस्ट २०२४ मध्ये प्रकाशित झाले आणि ते जागतिक स्तरावर संगीत प्रेमींनी आणि समीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. टंडन यांचे याआधी २००९ च्या ‘सोल कॉल’ अल्बमसाठी नामांकन झाले होते, परंतु त्यांना त्या वेळी पुरस्कार मिळाला नव्हता. यंदा प्रथमच त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रॅमी पुरस्काराच्या १२ विविध क्षेत्रांत आणि ९४ श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले,. यामध्ये प्रसिद्ध अमेरिकी रॅपर-हिपहॉप कलाकार केंड्रिक लामार याने ‘नाट लाईक अस’ अल्बमसाठी पाच प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले.
चंद्रिका टंडन यांचे संगीत करिअर
-
चंद्रिका टंडन यांचे आणखी तीन अल्बमही प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी भारतासह युरोपमध्ये संगीताचे कार्यक्रम केले आहेत.
-
चंद्रिका एक प्रख्यात व्यवसायिक आणि संगीतप्रेमी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या आवाजाने आणि संगीताच्या माध्यमातून विविध संस्कृतींमध्ये समांतरता निर्माण केली आहे.
-
‘त्रिवेणी’ अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात संस्कृतींचे संगम आणि संगीताचे एकजुटीचे प्रतीक आहे.
याविषयी बोलताना ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका चंद्रिका टंडन म्हणतात, “संगीत हे प्रेम आहे. प्रकाश व हास्यही आहे. आपण सर्वजण प्रेम, प्रकाश आणि हास्याने वेढलेले राहूयात. संगीताबद्दल धन्यवाद आणि संगीताची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. आमच्यासाठी हा खरोखरच एक विशेष क्षण आहे. पुरस्काराच्या श्रेणीतील सर्वच नामांकने छान होती. काही उत्तम संगीतकारांनाही नामांकन मिळाले होते.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter