हज यात्रेत लहान मुलांच्या प्रवेशावर आता निर्बंध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

सौदी अरबच्या हज आणि उमराह मंत्रालयाने हज २०२५ साठी काही महत्त्वपूर्ण नियमांची घोषणा केली आहे. हजसाठी असणाऱ्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पहिल्यांदा हज करणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सौदी अरबचे हज आणि उमराह मंत्रालय म्हणाले याविषयी सांगितले, “या निर्णयांचा उद्देश लहान मुलांची सुरक्षा करणे आणि वार्षिक हज यात्रेदरम्यान होणारी गर्दी टाळणे आहे.” 

सौदी सरकारचे नवे नियम 
सौदी सरकारने हज यात्रा अधिक सोयीची आणि सुरक्षित बनवण्यासाठी नवीन नियमांची घोषणा केली आहे. यामागे हज यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुलभ करण्याचे उद्देश आहे. सौदी अरबमधील मक्का शहर मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानले जाते.  हज आणि उमराह मंत्रालयाने माहितीनुसार हे उपाय सुचवले आले.  
  • आरोग्य संबंधित नियमांची अंमलबजावणी
  • पवित्र स्थळांवर तीर्थयात्रिकांची संचार व्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी स्मार्ट प्रणालीचा वापर
  • तीर्थयात्रिकांच्या सोयीसाठी शिविर आणि मार्गांचा सुधारणा

ऑनलाइन रजिस्ट्रेशन विविध सुविधा   
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सौदी सरकारने हज रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यासाठी नुसुक अॅप आणि ऑनलाइन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येईल. यावर हज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि ई-वॉलेटचा वापर करून याचे पेमेंट करता येईल. सौदी अरेबियातील स्थानिक नागरिकांसाठी आणखी एक सुविधा जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक हज पॅकेज तीन टप्प्यांमध्ये भरू शकतात. २० टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात भरावी लागेल. बुकिंगच्या ७२ तासांच्या आत हे पैसे भरावे लागतील. तर दुसरा आणि तिसरा टप्पा ४० टक्के असेल. पूर्ण पेमेंट होईपर्यंत बुकिंग निश्चित मानले जाणार नाही. प्रत्येक वेळी पेमेंट केल्यावर पावती दिली जाईल.

वीजा नियमातील बदल
यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरबने वीजा नियमांमध्येही बदल केला आहे. या बदलांचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. या बदलांमुळे भारतासह १४ देशांच्या नागरिकांना एकल प्रवेश वीजा दिला जाणार आहे. या बदलाचा उद्देश अनधिकृतपणे हज यात्रा करणाऱ्यांना रोखणे आहे. अनाधिकृतपणे हज यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे सौदीमध्ये गर्दी निर्माण होत होती. यामुळे व्यवस्थापनासाठी अडचणी निर्माण होत होत्या. एकल प्रवेश वीजा दिल्याने हा प्रश्न दूर होईल. 

हज यात्रा ही पाच दिवसांची असते. पाच दिवस चालणाऱ्या ही यात्रा अत्यंत खडतर असून त्यासाठी शारीरिक कस लागतो. यामुळे नागरिकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. उष्ण तपमान असल्यामुळे लहान मुलांना देखील त्रास होण्याची शक्यता असते. मुलांना हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लाम मध्ये लहान मुलांना त्यांच्या ५ कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे.पहिल्यांदा हज करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे नवीन हज यात्रेकरूंसाठी संधी उपलब्ध होईल. हज यात्रेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट प्रणालींचा वापर करण्यात येईल. याशिवाय, हज यात्रेकरूंच्या आरामासाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter