इलॉन मस्कची संपत्ती झाली 'इतक्या' अब्ज डॉलर्सची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
इलॉन मस्क
इलॉन मस्क

 

टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी इतिहास रचला आहे. ४००अब्ज डॉलर्सची संपत्ती असणारे ते जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्कची संपत्ती ४४७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. इलॉन मस्कची संपत्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांच्यापेक्षा सुमारे २०० अब्ज डॉलर्स जास्त आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एका दिवसात इलॉन मस्कच्या संपत्तीत ६२.८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे, त्यानंतर त्यांची संपत्ती ४००अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊन ४४७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. स्पेसएक्सच्या शेअर्सच्या वाढीमुळे टेस्ला प्रमुखाच्या नेट वर्थमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. २०२४मध्ये त्यांची संपत्ती २१८ अब्ज डॉलरने वाढली आहे.

ट्रम्प यांच्या विजयाने इलॉन मस्क यांना बूस्टर डोस
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यापासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. अध्यक्षीय निवडणुकीपासून, टेस्लाचे शेअर्स ६५ टक्क्यांनी वाढले आहेत. असे मानले जाते की ट्रम्प प्रशासन इलेक्ट्रिक वाहनांवरील कर क्रेडिट काढून टाकेल, ज्यामुळे टेस्लाला कंपनीला फायदा होईल.

सेल्फ ड्रायव्हिंग कारलाही प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या सोबतच इलॉन मस्क यांना ट्रम्प प्रशासनात प्रमुख स्थान मिळाले आहे. बुधवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान, टेस्लाचे शेअर्स ४.५०  टक्क्यांहून अधिक वाढले आणि ४२०.४० डॉलरच्या उच्चांकावर पोहोचले. ४ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत २४२.८४  डॉलर होती.

आता ५०० ट्रिलियन डॉलर्सकडे लक्ष
इलॉन मस्क आता वर्ष संपण्यापूर्वी ५०० अब्ज डॉलर्सकडे वाटचाल करतील. तेथे पोहोचण्यासाठी, इलॉन मस्ककडे १५ दिवसांपेक्षा जास्त वेळ आहे आणि इलॉन मस्कला फक्त ६० अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. याचा अर्थ ५०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी इलॉन मस्कच्या संपत्तीत दररोज ३.५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली पाहिजे. अशा स्थितीत वर्षअखेरीस मस्कची संपत्ती सहज ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter