ओलिसांना तात्काळ सोडा किंवा परिणाम भोगा - डोनाल्ड ट्रम्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

काही दिवसांपूर्वी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेचे विशेष दूत अॅडम बोहेलर यांनी हमासशी थेट चर्चा केली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमाससोबत गुप्त चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना थेट इशाराच दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये असलेल्या सर्व ओलिसांना तात्काळ सोडण्यास सांगितले आणि ओलिसांना लवकरात लवकर सोडण्याचा अंतिम इशारा दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "'शालोम हमास' म्हणजे हॅलो आणि गुडबाय यांमध्ये तुम्ही निवडू शकता. सर्व ओलिसांना आता सोडा, नंतर नाही. तसंच तुम्ही ज्यांची हत्या केलीय त्यांचे मृतदेह ताबडतोब परत करा, अन्यथा तुमच्यासाठी सर्व काही संपेल. आजारी आणि विकृत लोक असे मृतदेह ठेवतात आणि तुम्ही आजारी आणि विकृत आहात."

ते पुढे म्हणतात की, "काम पूर्ण करण्यासाठी मी इस्त्रायलला आवश्यक ते सर्व काही पाठवत आहे. ही तुमच्या नेतृत्वासाठी शेवटची चेतावणी आहे. तरीही तुमच्याकडं संधी आहे. ओलिसांना आत्ताच सोडा, अन्यथा नंतर तुम्हालाच त्रास होईल."