गाझामधील इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला सोमवारी (ता.२) धमकी दिली. २० जानेवारी रोजी होणाऱ्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीआधी ओलिसांची सुटका न केल्यास जबर किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी ट्रम्प यांनी हमासला दिली.
हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षों इस्राईलवर हल्ला करून २५० पेक्षा जास्त लोकांना ओलिस ठेवले होते. यात इस्त्रायली वंशाच्या अमेरिका नागरिकांचाही समावेश होता. इस्त्राईलच्या माहितीनुसार १०१ परदेशी आणि इस्रायली ओलिस अजूनही गाझामध्ये आहेत आणि सुमारे त्यातील निम्मे जिवंत असल्याचे मानले जाते.सर्वांत कठोर शिक्षा देणार ट्रम्प यांनी त्यांच्या 'टूथ' या सोशल मोडियावर ही धमकी दिली आहे. ते म्हणाले, "२० जानेवारी २०२५ पर्यंत ओलिसांची सुटका झाली नाही तर पश्चिम आशियात जवर किंमत चुकवावी लागेल. मानवतेविरुद्ध असे अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. याला जबाबदार असणाऱ्यांना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी शिक्षा भोगावी लागेल." जर वेळेत कार्यवाही केली नाही तर अमेरिका अशी शिक्षा करेल, जी आतापर्यंतच्या इतिहास कधीही देण्यात आलेली नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल सुरू करण्यापूर्वी युद्धबंदी आणि ओलिस सोडण्याचा करार होईल, अशी आशा ट्रम्प यांना असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
ट्रम्प यांचे आभार मानले
■ ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इलाईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने टिपणी करण्यास नकार दिला. पण देशाचे अध्यक्ष आयड्रॉक हरझोग यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. "धन्यवाद, डोनाल्ड ट्रम्प. आपल्या बहिणी आणि भावांना घरी परत आणण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करू." असे ते म्हणाले. अमेरिकेची सूत्रे अधिकृतपणे हाती घेण्यापूर्वीच ट्रम्प यांनी ही धमकी दिली असली तरी दुसऱ्या बाजूला हमासने ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्ध संपविण्याची आणि गाझामधून इलाईलची संपूर्ण माघार घेण्याची मागणी केली आहे. तर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा समूळ नायनाट होईपर्यंत युद्ध सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत. याविरोधात इस्राईलमध्येही निषेधाचे आवाज उठले आहेत. ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन तेथील नागरिकांनी नेतान्याहू यांना केले आहे.