गोल्डमैन सॅशचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार ३० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. AI तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या खतम होतील, अशी चर्चा आहे. हा प्रश्न सर्व क्षेत्रातील लोकांना पडला आहे. ChatGPT मुळे तर यात आणखी भर पडली आहे.
दरम्यान गोल्डमैन सॅशचा एका अहवालात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार अमेरीका आणि युरोपियन युनियनमधील सुमारे दोन तृतीयांश नोकऱ्या AI तंत्रज्ञानामुळे जातील. याचा मोठा परिणाम प्रशासकीय आणि कायदा क्षेत्रावर होणार आहे.
अहवालानुसार, AI ४६ टक्के प्रशासकीय आणि ४४ टक्के कायदेशीर नोकर्या हाताळेल. त्यामुळे या क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. बांधकाम आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील नोकऱ्यांवर त्याचा ६ टक्के परिणाम होईल.
AI मुळे आर्थिक विकासाला नक्कीच चालना मिळेल. गोल्डमैन सॅशच्या मते, AI मुळे, पुढील १० वर्षांत जागतिक विकास दर ७ टक्क्यांनी वाढेल.
अहवालानुसार AI तंत्रज्ञानामुळे श्रम खर्चात बचत होणार आहे. नवीन रोजगार निर्मिती आणि उच्च उत्पादकता यामुळे विकासाला चालना मिळेल. संशोधनानुसार AI चा जवळजवळ सर्व क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. ऑटोमेशन सर्व व्यवसायांवर परिणाम करेल. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑटोमेशनवर केवळ ५ टक्के काम सोडले जाऊ शकते.
मात्र AI चा प्रभाव शेवटी त्याच्या क्षमतेवर आणि कंपन्यांच्या स्विकारावर अवलंबून असेल.सध्या तरी याबाबत निश्चित मुदतीची माहिती नाही. कारण हे तंत्रज्ञान अजून विकसित होत आहे. अमिरेकेत पुढच्या १० वर्षात AI मुळे १.५ टक्के कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
जर तंत्रज्ञान आपल्या वचनानुसार जगले तर बाजारपेठेत याचे मोठे परिणाम होतील. मोठ्या अर्थव्यवस्थांमधील ३०० दशलक्ष पूर्ण-वेळ कामगारांची मोठी उलथापालथ होईल, असे जोसेफ ब्रिग्ज आणि देवेश कोडनानी यांनी अहवालात म्हटले आहे. यामध्ये सर्वात मोठा धोका असलेल्यांमध्ये वकील आणि प्रशासकीय कर्मचारी असतील.