छ. संभाजीनगरमध्ये पहिल्या अल्पसंख्याक वसतिगृहाची पायाभरणी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 6 d ago
अल्पसंख्याक वसतिगृहाचे भूमिपूजन करताना केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार
अल्पसंख्याक वसतिगृहाचे भूमिपूजन करताना केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार

 

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत. नुकतच त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे त्यांनी अल्पसंख्यांक समाजातील मुलामुलींसाठी महाराष्ट्रातील पहिल्या वसतिगृहाचे भूमिपूजन केले. 

दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मुस्लिम समजाविषयी महत्वाची विधाने केली होती. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकासह मुस्लिम समाजाला न घाबरण्याचे आवाहन केले. 

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री 
किरेन रिजिजू यांनी मंगळवारी सिल्लोड येथे शहरातील प्रियदर्शनी चौकात राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलां - मुलींसाठी ३६ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह भूमिपूजन केले. यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
    

छत्रपती संभाजीनगर येथे वसतीगृहाचे भूमिपूजन केल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “ देशातील डोंगर दऱ्यात ग्रामीण भागातील वाडीवस्तीत राहणाऱ्या गोरगरीब अल्पसंख्याकांसह दुर्बल आणि गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा फायदा दिला जाईल. आम्ही अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहोत. २०४७ पर्यंत देश मोदींच्या मार्गदर्शनाखाली विकसीत भारत होईल.”

तसेच त्यांनी या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले, “ छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड येथे अल्पसंख्यांक मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाची आज पायाभरणी करण्यात आली. आपले तरुण मोठी स्वप्ने पाहू शकतात आणि उज्ज्वल भविष्य घडवू शकतात असे वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.”
 
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार भूमीपूजनावेळी म्हणाले, “सिल्लोड शहरात अल्पसंख्याक समाजाच्या  २५० मुलं व २५० मुली अशा ५०० विद्यार्थ्यांना राहण्यासाठी प्रशस्त वसतिगृह केले जाणार आहे. अल्पसंख्याक समाजातील वाडी वस्तीत पायाभूत सुविधा दिल्या जातील. अल्पसंख्याक समाजाच्या शाळांचा निधी २ लाखावरून १० लाख करण्यात आला आहे.” 

याविषयी त्यांनी सोशल मिडियावर ट्वीट करत माहिती दिली. ते म्हणाले, “ अल्पसंख्यांक समाजातील मुलामुलींसाठी महाराष्ट्रातील पहिले वस्तीगृह सिल्लोड शहरात अल्पसंख्यांक समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून सिल्लोड शहरात भव्य वसतिगृह असावे यासाठी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु होता. या प्रयत्नाला कमालीचे यश आले आहे.” 
 
मंत्री अब्दुल सत्तार यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विशेषतः मुस्लिम समाजासाठी विकासातही नवीन उपक्रमांची घोषणा केली. ते म्हणाले, “सिल्लोड येथे उर्दू घराची उभारणी केली जाईल. त्या घरामध्ये प्रशस्त वाचनालय आणि इंटरनेट सुविधा करण्यात येईल. यामुळे ऑनलाइन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल आणि त्यांची शिक्षणात प्रगती होईल. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक बचत गटाला २ लाखांचे कर्ज दिले जाईल.“ 

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. शासनाच्या या योजनेचा अनेक विद्यार्थी फायदा घेत आहेत. या योजनेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच आर्थिक मदत देखील केली जाते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter