डोनाल्ड ट्रम्प यांना 'असा' मिळाला सर्वोच्च दिलासा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची कोर्टाने ३४ आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याची टिप्पणी कोर्टाने केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायाधिशांना म्हटलं की, 'मी सांगू इच्छित आहे की, माझ्यासोबत चुकीचं वर्तन झालं आहे. मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. ट्रम्प यांनी कोर्टात सातत्याने निर्दोष असल्याची बाजू मांडली'.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय आरोप होता?
ट्रम्प यांच्यावर २०१६ साली स्कॅडलमधून सुटका व्हावी, यासाठी अडल्ट स्टारला १ लाख ३० हजार डॉलर दिल्याचा आरोप होता. अडल्ट स्टारने पैसे घेऊन मौन राखावं, यासाठी पैसे दिल्याचा आरोप होता. मागील वर्षीच्या मे महिन्यात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आज शुक्रवारी ट्रम्प यांची कोर्टात व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगद्वारे सुनावणी झाली.

प्रॉसिक्यूटर स्टेनग्लास यांनी सुनावणीदरम्यान आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तवणुकीवर टीका केली. ट्रम्प यांनी केस कमकुवत करण्यासाठी एक अभियान चालवलं. त्यांनी ट्रम्प यांच्या अनेक वक्तव्याचा उल्लेख केला. यात त्यांनी या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा केला.

प्रॉसिक्यूटरने त्यांचा वक्तव्याचा उल्लेख केला. त्यात ट्रम्प यांनी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिसला भ्रष्ट असल्याचं म्हटलं होतं. स्टेनग्लास यांनी कोर्टात म्हटलं की, 'ट्रम्प यांनी कोर्ट आणि प्रक्रियेवर टीका करण्यात आली. याचा कोर्टाच्या बाहेर परिणाम झाला. ट्रम्प यांनी गुन्हेगारी न्यायालयीन प्रक्रियेवर टीका केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या.