इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो
गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे विकास करण्याचे धक्कादायक विधान केले होते. ट्रम्प यांच्या विधानानंतर गाझा पट्टीसह अरब राष्ट्रांमध्ये या वक्तव्यावर तीव्र नाराजी असतानाच अमेरिकेच्या अनेक मित्रराष्ट्रांनीही या घोषणेला विरोध केला होता.
अशातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझामधून पॅलेस्टिनी लोकांना स्थलांतर करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचे चिन्ह दर्शवले आहेत. रविवारी (दि.१७) त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे संकेत दिले आहेत.
नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राज्य सचिव मार्को रुबिओ यांच्याशी या योजनेवर चर्चा केली. शस्त्रसंधीच्या दुसऱ्या टप्प्यावरील चर्चा अद्याप सुरू न झाल्यामुळे अनिश्चितता निर्माण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आगामी काळात सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब देशांना भेट देणार आहेत. अमेरिकेच्या गाझाच्या पुनर्विकासासाठीच्या प्रस्तावानंतर अरब नेत्यांकडून अधिक विरोध येण्याची शक्यता आहे. दरम्यान नेतन्याहू यांनी म्हटले आहे की गाझामधील लोकांचे स्थलांतर हे त्यांच्या मर्जीने झाले पाहिजे.
नेतन्याहू पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, "आम्ही ट्रम्प यांच्यासोबत एकत्र येऊन गाझासाठी सामायिक धोरणाचा अवलंब करणार आहोत."