इस्राईल आणि हिज्बुल्ला यांच्यात अखेर शस्त्रसंधी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
इस्राईल-हिज्बुल्ला शस्त्रसंधीनंतर आनंद व्यक्त करताना नागरिक
इस्राईल-हिज्बुल्ला शस्त्रसंधीनंतर आनंद व्यक्त करताना नागरिक

 

लेबनॉनमधील हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना आणि इस्त्राईल यांनी शस्त्रसंधीला मान्यता दिली असून, आजपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या करारामुळे मागील चौदा महिन्यांपासून इस्त्राईलच्या उत्तर सीमेवर आणि लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेला बाँबवर्षाव थांबण्याची आशा आहे. शस्त्रसंधी जाहीर झाल्यापासून दक्षिण लेबनॉनमधील शहरांमधील निर्वासित झालेले नागरिक परतत आहेत. 

गाझामधील हमास आणि इसाईल यांच्यात शस्त्रसंधी होण्याचे अनेक प्रयत्न विफल ठरले आहेत. त्यापार्श्वभूमीवर इस्माईल आणि हिज्बुल्ला यांच्यात शस्त्रसंधी झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील अनेक महिन्यांमध्ये, विशेषतः दोन ते तीन महिन्यांत इसाईलने दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हल्ले केले. त्यामुळे लाखो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. शस्त्रसंधीचा कालावधी सुरू होताच अनेक नागरिक आपल्या घराकडे परतत आहेत. नागरिकांनी इतक्यात परतू नये, असे आवाहन इस्लाईलने केले असले तरी महामार्गावर सामान घेवलेल्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशी तरी कोणताही संघर्ष झालेला नाही. मात्र, हिज्बुल्लाने कराराचा भंग केल्यास त्यांच्यावर हल्ला करण्याचा इशारा इस्लाईलने दिला असून करारातही तसे स्पष्ट करण्यात आला आहे. 

शस्त्रसंधी करारानुसार 
  • पहिला टप्पा म्हणून दोन महिन्यांसाठी हल्ले थांबविणे
  • दक्षिण लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाचा कोणताही तळ नसेल
  • लेवनॉनमध्ये घुसलेले इस्त्रायली सैन्यही परतणार
  • संयुक्त राष्ट्रांचे शांतता सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात असेल
  • परिस्थितीवर अमेरिकेचे अधिकारी लक्ष ठेवणार 
भारताकडून स्वागत 
इस्राईल -लेबनॉन यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीचे भारताने स्वागत केले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष थांबावा, हीच भारताची भूमिका असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. "दोन्ही बाजूंनी आता चर्चेचा मार्ग स्वीकारावा. या करारामुळे शांतता निर्माण होऊन स्थैर्याला बळ मिळेल," असे भारताने म्हटले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter