तब्बल महिन्याभरानंतर सुनीता विल्यम्स यांचा झाला जगाशी संपर्क

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
सुनीता विल्यम्स
सुनीता विल्यम्स

 

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोर यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) लाईव्ह सेशन झाले. हे लाईव्ह रात्री ८.३० वाजता सुरू झाले. नासाने हे लाईव्ह आयोजित केले असून यामध्ये अंतराळवीर नासाच्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांशी बोईंग स्टारलाईनरच्या स्थितिबद्दल संवाद साधत साधला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांच्याकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बूच विल्मोर हे ५जूनला अंतराळ स्थानकावर गेले होते.पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या अभ्यासाचा भाग त्यांनी दहा ते बारा दिवसांमध्ये पूर्ण केला. पण परतीच्या वेळी त्यांचे अंतराळयान बोईंग स्टारलाईनर हे यान खराब झाले त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आणि हेलियमचे गळती असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे धोका पत्करून अंतराळवीरांना पृथ्वीवरती परत बोलण्यास नाकार नासाने नकार दिला.

तेव्हापासून सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर अवकाश स्थानातच अडकून राहिले आहेत. तेथून ते सतत नासाच्या टीम सोबत संपर्कात असलेले असल्याचे नासिक नासाने स्पष्ट केले. नासाला या हेलियम गळतीचे आणि बॉइंग स्टारलाइनर मध्ये तांत्रिक अडचण असल्याची माहिती पूर्वीपासूनच असल्याचे देखील आरोप झाले. असे असताना देखील त्यांनी सुनीता विल्यम्सला या बिघाड असलेल्या यांना मधून अवकाशात का पाठवले असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

जे लाईव्ह सेशन झाले त्यातून सुनीता विल्यम्सने अंतराळ स्थानक आणि यानाची खरी परिस्थिती सांगितली त्यांच्या मते, अंतराळयांनामध्ये आत राहण्यात सध्या कोणताच धोका नाही आणि ती लवकरच सुखरूप पृथ्वीवर परत येणार आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर असणाऱ्या त्यांच्या परिजनांना देखील तुम्ही काळजी करू नका असे म्हणत लवकरच परतणार असल्याची माहिती दिली. नासाकडून या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी कोणतीही गडबड केली जात नाही नाहीये कारण नासाच्या म्हणण्यानुसार जो तांत्रिक बिघाड आहे तो पूर्णपणे दुरुस्ती झाल्याशिवाय अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याची कोणतीही जोखीम घेतली जाणार नाही. ही परती अजून ४५ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

लाईव्ह सेशननंतर सुनीता विल्यम्सने आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि लाईव्हद्वारे अवकाशातील स्थिती बद्दल संपूर्ण जगाशी संवाद साधला तसेच या मिशन मधून अजून बरेच काही चांगले साध्य होणार आहे अशी आशाही दाखवली. या दिलासादायक माहितीनंतर आता भारतीयांना सुनीता विलियम्सच्या पृथ्वीवर परतीबद्दल सकारात्मक आशा निर्माण झाल्या आहेत.