निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना दिले 'हे' निर्देश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 12 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिलांविरोधात राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या अपमानस्पद वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, याची निंदाही केली आहे. एवढंच नाहीतर राजीव कुमार यांनी अधिकाऱ्यांना अशा वक्तव्यांविरोधात त्याचवेळी कडक कारवाई करण्याचेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालायतील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, एका समीक्षा बैठकीदरम्यान राजीव कुमार यांनी महिलांचा सन्मनाविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेवर नाराजी व्यक्त केली. बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि रिटर्निंग अधिकारी हजर होते.

निवडणूक आयुक्तांनाही राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी महिलांच्या सन्मानास धक्का पोहचवणारी कोणतीही विधानं करू नये. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, नेते किंवा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खासगी आयुष्यातील कोणत्याही मुद्द्यावर टीका नाही झाली पाहीजे. विरोधकांना कमी लेखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खालच्या पातळीवरील आरोप झाले नाही पाहीजेत.

याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हेही स्पष्ट केले आहे की, उमेदवार किंवा राजकीय नेत्यांद्वारे महिलांच्या सन्मानाविरोधात केल्या जाणाऱ्या कोणत्याही टिप्पणीवर निवडणूक आचारसंहितेच्या तरतूदीनुसार कडक कारवाई केली गेली पाहीजे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की सर्व उमेदवार आणि पक्षनेते आपली भाषणं आणि सार्वजनिक संवादात महिलांबाबत आदर दर्शवत आपली वर्तवणूक सुधारतील.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter