बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजनेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 5 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महिला आणि बाल विकास मंत्रालय ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त  विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भातील उद्घाटन कार्यक्रम आज न्यू दिल्लीतील विज्ञान भवन येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात  "माझा भारत" स्वयंसेविकांच्या रूपात मुलींच्या विद्यार्थ्यांचा, अंगणवाडी पर्यवेक्षिका/कामगार, तसेच राज्य आणि जिल्हा प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींनाही या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. 

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक महिला आणि बाल विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केले.

या परिपत्राकात मंत्रालयाने सांगितले की, मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचे यंदा दहावे वर्ष आहे. ही दहा वर्ष  ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या दृष्टीकोनाशी आणि जागतिक पातळीवर महिलांच्या विकासापासून ते महिलांच्या नेतृत्वातील विकासाकडे होणाऱ्या बदलाशी एकरूप आहेत. या परिवर्तनाला भारताच्या G20 अध्यक्षतेदरम्यान प्रोत्साहित करण्यात आले आहे. तसेच या बदलला आता ब्राझीलच्या G20 मध्येदेखील स्वीकारले गेले आहे. तसेच येत्या काळात महिला या लाभार्थी न बनत नेतृत्वकर्त्या बनतील.
  
कार्यक्रमात होणार विविध उद्घाटणे  
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून इतर विविध उपक्रमांचे उद्घाटन केले जाणार आहे. यामध्ये शपथ विधी आणि उत्तम प्रथा संकलनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच मिशन वात्सलय आणि मिशन शक्ती पोर्टल्सचे उद्घाटन देखील केले जाणार आहे. 

राज्य आणि जिल्हापातळीवर विविध कार्यक्रम 
दिल्ली येथे आयोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर देशभर राज्य आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम राबवले जाणार आहे. यामध्ये २६ जानेवारी आणि  ८ मार्च दिवशी विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत.  या कार्यक्रमांमध्ये रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान समारंभ आणि SANKALP: Hub for Empowerment of Women अंतर्गत विविध मोहिमा पार पडतील. यामध्ये शालेय मुली, यशस्वी महिलां कार्यकर्त्यांचा आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग असेल. या कार्यक्रमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा उद्देश पुन्हा एकदा अधोरेखित केला जाईल. तसेच एक वृक्षारोपण मोहीमही राबवली जाईल.

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ योजना  
"बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ" योजना केंद्र सरकारने २२ जानेवारी २०१५मध्ये सुरू केली. ही योजना आता  धोरणात्मक राष्ट्रीय चळवळ बनली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लिंगभेद आणि मुलींच्या हक्कांची सुरक्षा करणे असा होता. या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात मोठी सुधारणा झाली आहे. तसेच समाजातील लिंगभेद आणि मुलींच्या शिक्षणासाठी जागरूकता देखील वाढली आहे. 

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेने समाजात लिंग समानता आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योजनेंतर्गत विविध उपक्रम राबवले गेले आहेत. यामध्ये यशस्विनी बाईक मोहिम, कन्‍या शिक्षण प्रवेश, राष्ट्रीय कौशल परिषद : बेटियां बने कुशल अशा उपक्रमांचा समावेश आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter