राष्ट्रीय बालिका दिन : मुलींच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 2 d ago
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

 

काल बालिका दिन राज्यसह देशभर साजरा करण्यात आला. या बालिका दिनाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुन्हा एकदा मुली आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा नारा दिला. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माहिती दिली.

मोदी यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देत ट्वीटरवर लिहले, “राष्ट्रीय बालिका दिनानिमित आम्ही बालिकांना सशक्त बनवण्याच्या आणि त्यांना विविध संधी उपलब्ध करण्याच्या आमच्या बांधिलकीला पुन्हा एकदा अधोरेखित करतो. सर्व क्षेत्रात मुलींच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. भारताच्या मुलींनी केलेले पराक्रम आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहेत.” 

मोदी यांनी पुढे लिहले, “सरकार बालिकांना सशक्त बनविण्यासाठी विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे. सरकारने शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे बालिकांना सशक्त बनविण्यात योगदान मिळाले आहे. बालिकांसोबत कोणताही भेदभाव होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठीदेखील आम्ही कटिबद्ध आहोत.” 

राष्ट्रीय बालिका दिन 
२००८मध्ये  केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात केली. मुलींच्या हक्कांवर, शिक्षणावर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करणे हा राष्ट्रीय बालिका दिनाचा उद्देश आहे. दरवर्षी २४ जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय बालिका दिन हा मुलींच्या हक्कांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी महत्वाचा दिवस आहे. तसेच  बलिकांना लैंगिक पूर्वाग्रहांपासून मुक्त करत त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी बालिका दिवस योगदान देत आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजातील मुलींना समान महत्त्व देण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी हा दिवस सर्वांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter