एनडीएच्या दीक्षांत संचलनात प्रथमच महिलांची बटालियन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए ) ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत संचलनात (मार्चींग) महिलांच्या बटालियनने संचलन केले. स्वतः राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद केले.

एनडीएचा १४५ वे दीक्षांत संचलन गुरुवारी पहाटे दिमाखात पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर आदी उपस्थित होते.
 
संचलनाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, "आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दीक्षांत संचलनात महिलांचा सहभाग असणे निश्चितच कौतुकास पात्र आहे."
 
एनडीए मधून एकूण ३५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली असून, राष्ट्रपतींच्या त्यांनी संचलनानंतर 'अंतिम पग' पादाक्रांत केला. संचलनात १२ छात्र हे मित्र देशांतील होते.

कमांडो चीफ ऑफ स्टाफ बॅनर : हेमंत कुमार

राष्ट्रपती सुवर्णपदक : प्रथम सिंग

राष्ट्रपती रौप्य पदक : जतीन कुमार

राष्ट्रपती कांस्यपदक हर्षवर्धन : शैलेश भोसले