दीवान-ए-सिराज व अन्य गझलसंग्रहांचे प्रकाशन करताना साहित्यिक.
बाजीगर साहित्यसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आंधळे येथील ज्येष्ठ कवी, गझलकार सिराज शिकलगार यांच्या 'दीवान-ए-सिराज' व चार गझलसंग्रहांचे प्रकाशन झाले. कल्याण निधी सांस्कृतिक भवन येथे साहित्य संमेलनात प्रकाशन झाले.
डॉ.इक्बाल मिन्ने,छ.संभाजीनगर हे संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी होते. गझल अभ्यासक डॉ.अविनाश सांगोलेकर, गझल अभ्यासक डॉ.भारसवाडकर सर, मा.उर्मिलाताई बांदिवडेकर (माई), मा. विजय जोशी, मा.साबीर सोलापुरी, रवींद्र सोनवणे, सुधाकर इनामदार, भूषण कटककर, सुभाष मोहनदास, बबन धुमाळ, विजय खाडे तसेच मुंबई, ठाणे ,पुणे, छ.संभाजीनगर सोलापूर, सांगली, सातारा अशा विविध भागातील अनेक मान्यवर, कवी, गझलकार, साहित्यिक व स्नेही या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होते. सिराज शिकलगार यांची आजवर ३१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'दीवान-ए-सिराज' हा मराठी गझल साहित्यातील पाचवा दीवान आहे.
दुपारच्या सत्रात सुधाकर इनामदार व डॉ.लक्ष्मण हेंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार गझल मुशायरा व कवीसंमेलन संपन्न झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शांतीनाथ मांगले व कविता काळे यांनी केले.