भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो संघासाठी निवड झालेला जिल्हा पुरुष, महिला व किशोरीचा संघ
भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याची पुरुष, महिला व किशोरी संघ रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला रवाना झाले.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या पुरुष संघाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळाचे खेळाडू जुबेर शेख, तर जिल्ह्याच्या महिला संघाच्या कर्णधारपदी किरण स्पोर्ट्सची खेळाडू सादिया मुल्ला हीची निवड करण्यात आली. याशिवाय किशोरवयीन संघाच्या कर्णधारपदाची धुरा न्यू सोलापूर क्लबची खेळाडू सृष्टी काळे हिच्याकडे सोपण्यात आली. या स्पर्धेसाठी खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
तीनही गटातील जिल्हा संघांचे सराव शिबिर हरिभाई देवकरण प्रहाला व वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. या शिबिराचा समारोप स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत देणे यांच्या हस्ते झाला.
पुरुष संघ
जुबेर शेख (कर्णधार), विजय संगटे, जाफर शेख (न्यू सोलापूर), सौरभचव्हाण, राकेश राठोड, समर्थ कोळी, अक्षय इंगळे, रोहन राजपूत (किरण स्पोर्ट्स), अजित रणदिवे, गणेश बोरकर, अजय कश्यप, कृष्णा बनसोडे (अर्धनारी नटेश्वर वेळापूर), तुषार चव्हाण (फ्लाइंग स्पोर्ट्स, पंढरपूर), आकाश हजारे, अमोल केदार (शिवप्रतिष्ठान, मंगळवेढा), उमाकांत गायकवाड (प्रशिक्षक) अजित शिंदे (व्यवस्थापक).
महिला संघ
सादिया मुल्ला (कर्णधार), मुष्टी रूपना, गौरी काशविद, सपना खंडे, साक्षी व्हनमाने, अर्चना व्वहनमाने, आरती खरात, सृष्टी नारायणी, मयुरी स्वामी, (किरण स्पोर्ट्स), स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने, समृद्धी सुरवसे, साक्षी देठे, श्रुती कस्तुरे (केके स्पोर्ट्स वाडीकुरोली), अक्षता प्रचंडे (समृद्धी स्पोर्ट्स), मोहन रजपूत (प्रशिक्षका), अमृता स्वामी (व्यवस्थापिका).
किशोर संघ
सुष्टी काळे (कर्णधार), आसावरी जाधव, संस्कृती बिसले (न्यू सोलापूर), फतुजा सुरत्रसे, कार्तिकी यलमार, श्रेया पलमार, सुथ्या घाडगे, भक्ती गौधरी (चांडीकुरोलो), अक्षता गंगोडा, सुधी हडपद, पवित्रा नागलगाय (ममृद्धी स्पोट्र्स), खुशी पवार, माहन राठोड (किरण स्पोट्र्स), ज्योतो को (कक्बस), रिया चव्हाण (उत्कर्ष), संतोष कदम (प्रशिक्षक), सोनाली केत (व्यवस्थापिका).
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter