महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) चे पहिले दोन हंगाम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, आता तिसरा हंगाम आजपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ५ संघ विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी जोर लावताना दिसून येणार आहेत. तर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन ४ शहरांमध्ये केले जाणार आहे. ज्यात मुंबई, बंगळुरू, बडोदा आणि वडोदरा या ४ शहरांचा समावेश असणार आहे.
देशातील चार शहरांमध्ये सामने होणार
महिला प्रीमियर लीग २०२५ चे सामने देशातील चार शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. या स्पर्धेचा पहिला टप्पा वडोदरा येथे सुरूवात होणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. पुढील टप्पा प्रथमच यावेळी लखनऊमधील एकाना स्टेडियमवरही खेळवले जातील. अंतिम टप्पा मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
डब्ल्यूपीएलमध्ये एकूण ५ संघ खेळतात, ज्यात गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. लीग टप्प्यात, सर्व संघांना एकमेकांविरुद्ध किमान २ सामने खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर एलिमिनेटर सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळला जाईल.