गोलंदाजीत सहा विकेट आणि फलंदाजीत नाबाद ३९ धावा या दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी वेस्ट इंडीज महिलांचा तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट आणि ३० षटके राखून पराभव केला आणि व्हाईटवॉश दिला.
काही दिवसांपूर्वी टी-२० मालिकाही जिंकणाऱ्या भारतीय महिलांनी या एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले, वेस्ट इंडीज महिला संघाला प्रतिकार करण्याचीही संधी दिली नाही. आजच्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजचा डाव ३८.५ षटकांत अवघ्या १६२ धावांत गुंडाळला. यात दीप्ती शमनि ३१ धावांत सहा विकेट अशी कामगिरी केली.
वेस्ट इंडीज संघाकडून शेमिन कॅम्पबेली हिने ४६, तर चिनेली हेन्री हिने ६१ घावा केल्या, पण त्याअगोदर मध्यमगती गोलंदाज रेणूका सिंगने सुरुवातीला वेस्ट इंडीज फलंदाजीची दाणादाण उडवली होती. त्यांची सलामीवीर आणि कर्णधार हेली मॅथ्यूज व क्विना जोसेफ यांना शून्यावर बाद केले. त्यानंतर देंद्रा डॉटिन हिलाही आल्या पायी माघारी धाडले. त्यामुळे विंडीजची तीन बाद नऊ अशी अवस्था झाली होती.
फॉर्मात असलेल्या भारतीयांसाठी १६३ धावांचे आव्हान किरकोळ होते, परंतु स्मृती मानधना, रितिका रावल आणि हर्लिन देओल बाद झाल्या तेव्हा धावफलकावर अर्धशतकी धावा नोंदल्या गेल्या होत्या. कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी संघाला विजयी पथावर ठेवल्यानंतर दीप्ती आणि रिचा घोष यांनी २९ व्या पटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. दीप्ती सामन्यात, तर रेणूका सिंग मालिकेत सर्वोत्तम ठरली.
वेस्ट इंडीज ३८.५ षटकांत सर्वबाद १६२ (शेमिन कॅम्पबेली ४६, चिनेली हेन्री ६१, अलिया अलेनी २९, अवांतर ११, रेणूका सिंग ९.५-०-२९- ४, दीप्ती शर्मा १०-३-३१-६) पराभूत वि. भारत: २८.२ षटकांत ५ बाद १६७ (स्मृती मानधना ४, हरमनप्रीत कौर ३२- २२ चेंडू, ७ चौकार, जेमिमा रॉड्रिग्ज २९४५ चेड़, १ चौकार, दीप्ती शर्मा नाबाद ३९ - ४८ चेंद्र, ३ चौकार, १ पटकार, रिचा घोष नाबाद २३-११ चेंडू, १ चीकार, ३ षटकार).