Wimbledon 2024 : पुरुषांमध्ये अल्काराज तर महिलांमध्ये क्रेयचीकोव्हा विजेते

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लंडनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबमध्ये पार पडलेल्या विम्बल्डन २०२४ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्काराजने मिळवले तर महिलांच्या सामन्यात बार्बोरा क्रेयचीकोव्हा हिने विजेतेपद नावावर केले. स्पेनच्या अल्काराज याने दिग्गज नोव्हाक जोकोविचला अंतिम सामन्यात ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. तर महिलांच्या एकेरीची फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेयचीकोव्हाने इटलीची जास्मीन पाओलिनी हिला ६-४ अशी बाजी मारून चुरशीच्या सामन्यात विजेतेपद पटकावले. 

अल्काराजचे हे एकूण चौथे ग्रँडस्लॅम, तर दुसरे विम्बल्डन विजेतेपद आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अल्काराजने दोन्ही विम्बल्डन विजेतीपदं अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत करत जिंकले आहे. अल्काराजने यापूर्वी अमेरिका ओपन २०२२ आणि फ्रेंच ओपन २०२४ या ग्रँडस्लॅम स्पर्धांचेही विजेतेपद जिंकले आहे.
 
अल्काराजचे वर्चस्व
रविवारी २ तास २७ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात अल्काराजने पहिल्या दोन्ही सेटमध्ये जोकोविचवर पूर्ण वर्चस्व ठेवले होते. पहिल्या दोन्ही सेटमध्ये त्याची सर्व्हिस जोकोविचला भेदता आली नाही.

पण तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने चांगले पुनरागमन केलं, त्याने स्वत:ची सर्व्हिस तर राखलीच पण चॅम्पियनशीपसाठीच्या पाँइटसाठी अल्काराज खेळत असताना जोकोविचने त्याला रोखत गेम जिंकला. अखेर हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्येही अल्काराज जोकोविचवर भारी पडला.
 
महिलांच्या सामन्यात क्रेयचीकोव्हाची बाजी
पहिला सेट बार्बोराने ६-२ असा सहज जिंकला, परंतु २०२१च्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या विजेत्या खेळाडूला कडवी टक्कर मिळाली. २८ वर्षीय जास्मीनने जबरदस्त पुनरागमन करताना दुसरा सेट ६-२ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये बार्बोराने ५-३ अशी आघाडी घेतली होती आणि तिला फक्त एक गेम जिंकायचा होता. पण, जास्मीनने कडवी टक्कर देताना सेट ५-४ असा आणला. तरीही बार्बोराचे विजयाची हातची संधी होती.

जास्मीनने तिसऱ्या गेममध्ये ४०-३० अधी आघाडी मिळवून बार्बोरावर दडपण निर्माण केले. ४०-४० असे गुण समान झाले असताना बार्बोराने अडव्हान्टेज मिळवला. पण, जास्मीन हार मानण्यातली नव्हती आणि तिने अडव्हान्टेज आपल्याकडे खेचून आणला. दुर्दैवाने बॅकहँड एररमुळे जास्मीनला हा सेट गमवावा लागला आणि बार्बोराने ६-४ अशी बाजी मारून विम्बल्डन जेतेपद नावावर केले.