पर्थमध्ये भारताची विजयी पताका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 3 d ago
भारतीय कसोटी क्रिकेट संघ
भारतीय कसोटी क्रिकेट संघ

 

पहिल्या डावात सर्वबाद १५० आणि चौथ्या दिवशी २९५ धावांनी विजय अशी विजयाची झेप घेणाऱ्या भारतीय संघाने पर्धमध्ये विजयी पताका झळकावली. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला शरण आणून मालिकेत १-० आघाडी घेताना या सामन्यात नेतृत्व करणारा जसप्रीत बुमरा सामन्यात सर्वोत्तम ठरला.

रोहित शमएिवजी या सामन्यात नेतृत्व करणाऱ्या बुमराने दोन्ही डावात मिळून ७२ धावांत आठ विकेट, अशी कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ५८.४ षटकांत २३८ धावांत संपुष्टात आला. आज चौथ्या दिवाशी अखेरच्या सत्राचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियाचा अखेरचा फलंदाज बाद करून भारतीयांनी ही फिनिक्स भरारी घेतली.

काल तिसऱ्या दिवाली ऑस्ट्रेलियाची तीन बाद १२ अशी अवस्था केली तेथेच भारताचा विजय निश्चित झाला होता. आन ही औपचारिकता कधी पूर्ण होती याची उत्सुकता होती. आज खेळ सुरू झाल्यावर सिराजने उस्मान ख्वाजाला चकविले. काही वेळानंतर सिराजने स्टीव स्मिथ हा मोठा अडसर दूर केला. ऑस्ट्रेलियाने निम्मा संघ ७९ धावांत गमावला तेव्हा भारताला विजयासाठी जास्त काळ वाट पहावी लागणार नाही, हे स्पष्ट झाले.

भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असलेला दृव्हिस हेड पुन्हा विजयाच्या मार्गातील अडसर ठरण्याचा प्रपल करत होता. मिचेल मार्शसह त्याने डाव सावरला खरा, परंतु हे दोघे किती काळ किल्ला लढवतात, है महत्वाचे होते.

उपाहारानंतर विकेट मिळत नसल्याचे लक्षात येताच कुमरा फुहा गोलंदाजीस आला आणि त्याने एक आखूड टप्प्याचा चेडू टाकल्यानंतर पुढच्या चेंडूवर हेडला यष्टीरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. भारत विश्याच्या जवळ जात असताना मिचेल मार्श मात्र काहीशी आक्रमक खेळी करत होता, मात्र नितीशकुमार रेडीने आपली पहिलीवहिली कसोटी विकेट मिळवताना मार्शला बाद केले. हर्षित रागानेही एक विकेट मिळवली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने अखेरच्या येन विकेट मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

ऑस्ट्रेलियात मोठा विजय
धावांच्या तुलनेत भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या अगोदर १९७८ मध्ये सिडनी कसोटीत २२२ धावांनी मिळवलेला विजय भारतासाठी मोठा होता, परंतु त्या वेळी ऑस्ट्रेलियाचे बरेचसे मोठे खेळाडू कॅरी पेंकर या अनधिकृत स्पर्धेत खेळत होते. 

भारताला १० दिवसांची विश्रांती
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड येथे ६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. आणि हा पहिला सामना एक दिवस अगोदर संपल्यामुळे भारतीय संघाला आता १० दिवसांची विश्रांती मिळणार आहे, परंतु बादरम्यान ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन या संघाविरुद्ध प्रकाशझोतात सराव सामना होणार आहे. कारण, अॅडलेड कसोटी सामना प्रकाशझोतातील असणार आहे.

कर्णधार म्हणून भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी
■ १०/१३५ : कपिलदेव वि. वेस्ट इंडीज (अहमदाबाद १९८३)

■ १०/१९४ : बिशनसिंग बेदी वि. ऑस्ट्रेलिया (पर्छ १९७७)

■ ९/७० : बिशनसिंग बेदी वि. न्यूझीलंड (चेन्नई १९७६)

■ ८/७२ : जसप्रीत बुमरा वि. ऑस्ट्रेलिया (पर्थ) २०२४)

■ ८/१०९ : कपिलदेव वि. ऑस्ट्रेलिया (अॅडलेड १९८५)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे मोठे विजय
■ ३२० धावांनी (मोहाली २००८)

* २९५ धावांनी (पर्थ २०२४)

■ २२२ धावांनी (मेलबर्न १९७७)

 १७९ धावांनी (चेज़ई १९९८)

■ १७२ धावांनी (नागपूर २००८)

आशियाबाहेर भारताचे मोठे विजय (धावांच्या तुलनेत)
■ ३१८ धावांनी वि. वेस्ट इंडीज (नॉर्थ साऊंड २०१९)

■ २९५ धावांनी: वि ऑस्ट्रेलिया (पर्छ २०२४)

 २७९ धावांनी वि. इंग्लंड (हेडिंग्ले १९८६)

 २७२ धावांनी वि. न्यूझीलंड (ऑकलंड १९६८)

■ २५७ धावांनी वि. वेस्ट इंडीज (किंगस्टन २०१९)