व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांच्या स्पर्धेतून ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच महिला क्रीडामध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना सहभागी होण्यापासून बंदी घातली आहे. या आदेशावर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी सही केली. यावेळी त्यांनी सांगितले, “आतापासून महिला क्रीडा प्रकार हा फक्त महिलांसाठी असेल.
महिला खेळाडूंचे रक्षण आम्ही करणार आहे. पुरुषांना महिलांवर अत्याचार करू देणार नाही.” याप्रसंगी लहान मुले, महिला आणि काही अमेरिकी प्रतिनिधी सभा अध्यक्ष माईक जॉन्सन आणि काँग्रेसवुमन मार्जोरी ग्रीन यांसारख्या प्रमुख नेत्या उपस्थित होत्या.
'Keeping Men Out of Women's Sports'(महिलांच्या क्रीडामध्ये पुरुषांना बाहेर ठेवणे) असे या कार्यकारी आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार, केंद्राकडून निधी मिळणाऱ्या शाळांना महिला क्रीडामध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना सामील होऊ देण्याची परवानगी नसेल. या शाळांनी महिलांच्या क्रीडा प्रकारात पुरुषांना, ट्रान्सजेंडर खेळू दिले तर त्यांच्यावर करवाई केली जाईल. तसेच केंद्राकडून दिले जाणारा निधी बंद केला जाईल. ट्रम्प यांनी सांगितले, अमेरिका आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला २०२८ लॉस एंजल्स ऑलिंपिकसाठी ट्रान्सजेंडर खेळाडूंविषयीच्या नियमात बदल करण्यासाठी सांगणार आहे.
या बंदीचा आदेश अमेरिकेने राष्ट्रीय मुली आणि महिला क्रीडा दिवसाच्या निमित्ताने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ट्रम्प सरकारची ट्रान्सजेंडर व्यक्तींबद्दलच्या धोरणावर भूमिका स्पष्ट करत आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, “सरकारने ट्रान्सजेंडर विचारधारा सैन्यातून काढून टाकली आहे. १९ वर्षाखालील लोकांसाठी जेंडर ट्रांझिशन प्रक्रियेवर बंधने घातली आहेत. तसेच अमेरिकेत क्रीडासंस्थांमध्ये सहभागी होण्यासाठी खोटी ओळख देणाऱ्या खेळाडूंना व्हिसा देऊ नये अशा सूचना होमलँड सिक्योरिटी प्रमुख क्रिस्टी नोम यांना दिल्या आहेत.”
या आदेशाला काही स्तरावरून विरोध देखील झाला आहे. ट्रान्सजेंडर समुदाय, तसेच मानवाधिकार संघटनांनी या आदेशावर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मते हा निर्णय ट्रान्सजेंडर व्यक्तींविरुद्ध भेदभाव करणारा आहे. तर काही लोक या निर्णयाचे संरथान करत आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील ट्रान्सजेंडर व्यक्तींना क्रीडा क्षेत्रात असमानतेला तोंड द्यावे लागू शकते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter